काजवा महोत्सवाला ‘NGT’चा स्टॉप! आता निसर्ग पाहायचा, पण शिस्तीतच!
राष्ट्रीय हरित न्यायालय (NGT) ने काजवा महोत्सवावर कडक निर्बंध



काजव्यांचा चमचमाट बघायला जंगलात जाणाऱ्या पर्यटकांना आता थोडा ब्रेक लागणार आहे! कारण राष्ट्रीय हरित न्यायालय (NGT) ने काजवा महोत्सवावर कडक निर्बंध घालण्याचे आदेश दिलेत. पर्यावरणप्रेमी गणेश बोन्हाडे यांच्या याचिकेनंतर ही मोठी कारवाई झाली आहे.
मुद्दा काय आहे?
मे अखेरीस महाराष्ट्रातील कोयना, राधानगरी, महाबळेश्वर, माळशेज, राजमाची यांसारख्या ठिकाणी हजारो पर्यटक काजवे पाहायला रात्री जंगलात जातात. पण त्यांच्या गोंगाट, कचरा, फ्लॅश लाईट, मद्यपान यामुळे काजव्यांच्या प्रजननावर विपरीत परिणाम होतोय आणि जैवविविधता धोक्यात येतेय!
NGT चे कडक आदेश:
- रात्री 9 नंतर जंगलात एन्ट्री बंद!
- महोत्सव प्रत्येक वर्षी नाही – एक वर्षाआड!
- पर्यटकांना शिस्त आणि नियमांचे पालन गरजेचे!
- जंगलात फक्त ठराविक मार्गांनी प्रवेश द्या
- संवेदनशील भागांमध्ये मोठ्या संख्येने प्रवेश नाही!
- कोणतेही कार्यक्रम घेण्यापूर्वी वनविभागाची मान्यता बंधनकारक!
वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांच्या पुढाकारामुळे कोल्हापूरमध्ये महोत्सव आधीच बंद झाला आहे. आता इतर ठिकाणांनाही ‘ग्रीन सिग्नल’ मिळायचा असेल, तर नियमांची काटेकोर अंमलबजावणी हवीच!
#FireflyFestival #NatureFirst #NGTOrders #EcoAwareness
जंगल आहे म्हणून काजवे आहेत – आणि काजवे आहेत म्हणून आपण आहोत! म्हणूनच निसर्ग बघा, पण स्पॉईल करू नका! 
