Historic step!

अहिल्यानगरला मिळणार महात्मा-क्रांतीज्योतींचा पूर्णाकृती पुतळा – आ. संग्राम जगताप यांचा गौरव

💐
ऐतिहासिक पाऊल! अहिल्यानगरला मिळणार महात्मा-क्रांतीज्योतींचा पूर्णाकृती पुतळा – आ. संग्राम जगताप यांचा गौरव

अहिल्यानगर (प्रतिनिधी):
नगर शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर, माळीवाडा वेस येथे लवकरच इतिहास घडणार आहे. थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा एकत्रित पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. या ऐतिहासिक उपक्रमासाठी आमदार संग्राम जगताप यांचे मोलाचे योगदान असल्याने क्रांतीज्योती सावित्रीबाई – महात्मा फुले कृती समितीच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या उपक्रमामागे स्व. अरुणकाका जगताप यांची दूरदृष्टी होती. आता त्यांच्या स्वप्नाची पुर्तता आमदार संग्राम जगताप करत असून, नगरच्या वैभवात भर टाकणारा हा पुतळा येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणारा ठरेल, असे मत कृती समितीचे अध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी मांडले.

कार्यक्रमास सकल माळी समाजाचे अध्यक्ष किशोर डागवाले, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, माजी नगरसेवक ॲड. धनंजय जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, सचिव अशोक कानडे, तसेच डॉ. रणजीत सत्रे, विशाल देवस्थानचे पंडितराव खरपुडे, राजेंद्र पडोळे, विनोद पुंड, बजरंग भूतारे, प्रकाश इवळे, नारायण इवळे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किशोर डागवाले म्हणाले,
“अहिल्यानगरमध्ये प्रथमच महात्मा आणि सावित्रीबाईंचा भव्यदिव्य पुतळा उभा राहत आहे. हे केवळ पुतळ्याचे काम नाही, तर प्रेरणादायी इतिहासाला उजाळा देणारी गोष्ट आहे!”

कार्यक्रमाचा समारोप करताना बाळासाहेब भुजबळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.


🗣️ शेअर करा, प्रेरणा पसरवा!
अहिल्यानगरच्या भूमीत थोर समाजसुधारकांची स्मृती जिवंत राहणार आहे – ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूया!