**श्रीराम विद्यालयात घोटाळ्यांचा स्फोट!
मुख्याध्यापकाच्या हकालपट्टीसाठी शिव प्रहार संघटनेचं आंदोलन, चौकशीचे लेखी आश्वासन मिळाल्यावर उपोषण स्थगित!**
**श्रीराम विद्यालयात घोटाळ्यांचा स्फोट!
मुख्याध्यापकाच्या हकालपट्टीसाठी शिव प्रहार संघटनेचं आंदोलन, चौकशीचे लेखी आश्वासन मिळाल्यावर उपोषण स्थगित!**
नगर (प्रतिनिधी): पिंपळगाव माळवी येथील श्रीराम विद्यालयातील मुख्याध्यापकाच्या मनमानी कारभारावर अखेर शिव प्रहार संघटनेने थेट रस्त्यावर उतरून आवाज उठवला. विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी पैसे घेणे, दारू पार्टी, शाळेत कपड्याचं दुकान, शिक्षक भरतीत लाखोंचा अपहार, अशा गंभीर आरोपांवर कारवाई व्हावी यासाठी जिल्हा परिषद कार्यालयात उपोषण छेडण्यात आलं.
प्रमुख आरोप काय होते?
🔴 दरवर्षी गणवेश बदलून विद्यार्थ्यांकडून 1000 रुपये उकळणे
🔴 शाळा सोडण्याच्या दाखल्यासाठी प्रत्येकी 500 रुपये घेतले जातात
🔴 मुख्याध्यापकाच्या गाडीमध्ये दारूच्या बाटल्या आणल्या जातात
🔴 शाळेच्या आतच कपड्याचं दुकान सुरू
🔴 शिक्षक भरतीसाठी काहीकडून 10 तर काहीकडून 20 लाख रुपयांची मागणी
🔴 शिक्षणाचा दर्जा घसरलेला, शाळेचा प्रशासकीय भ्रष्ट्राचार कमालीचा
या सगळ्यावर माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी लेखी आश्वासन दिलं की,
“शाळेतील गैरकारभाराची चौकशी समिती गठीत करण्यात येणार असून, अहवालानुसार योग्य ती कारवाई केली जाईल.”
या लेखी आश्वासनानंतर शिव प्रहार संघटनेने आपलं उपोषण तात्पुरतं थांबवलं.
उपोषणात सहभागी:
गोरख आढाव, महादेव भोसले, आदिनाथ जिने, संतोष घोलप, शंकर बारस्कर, संदीप गुंड आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ.
📣 “शाळा शिक्षणासाठी की धंद्यासाठी?”
📲 तुमचं मत कमेंटमध्ये नोंदवा! बातमी शेअर करा!
#ShivPraharAction #SchoolScam #StudentRights #EducationNotExtortion #PimpalgaonMalvi