अहिल्यानगर जिल्ह्यात “केंद्रीय विश्वविद्यालय” सुरू करा – संसदेत खासदार नीलेश लंके यांची ठाम मागणी!
पारनेरचे लोकप्रिय खासदार नीलेश लंके यांनी संसदेत जबरदस्त आवाज उठवत, “अहिल्यानगर जिल्ह्यात केंद्रीय विश्वविद्यालयाची स्थापना करा” अशी ठाम मागणी केली आहे. त्यांच्या या दूरदृष्टीपूर्ण मागणीने संपूर्ण जिल्ह्यातील तरुणांमध्ये शिक्षणाबद्दल आशेचा किरण निर्माण झाला आहे.

खासदार लंके म्हणाले,
“अहिल्यानगर हा भौगोलिकदृष्ट्या राज्याच्या मध्यभागी आहे. त्यामुळे इथे विश्वविद्यालय सुरू झाल्यास मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना फायदा होईल.”
“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पुणे-मुंबईला जावे लागते, आर्थिक भार वाढतो आणि अनेकजण शिक्षण अर्धवट सोडतात.”
लंके यांनी प्रस्तावित विश्वविद्यालयाबाबत माहिती देताना सांगितले की,
येथे कृषी, अभियांत्रिकी, आरोग्य, सामाजिक शास्त्र, संशोधन यांसारख्या अभ्यासक्रमांची सुविधा असेल.
हे शिक्षणाचे केवळ केंद्रच नव्हे, तर संशोधन आणि तंत्रज्ञानाचं हब ठरेल.
हजारो शिक्षक, कर्मचारी, संशोधकांना रोजगार उपलब्ध होईल.
जिल्ह्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला गती मिळेल.
लंके यांनी अहिल्यानगरच्या ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्वावरही भर दिला. “इतिहासात समृद्ध असलेला हा जिल्हा शिक्षणातही पुढे जावा, हीच माझी इच्छा,” असे ते म्हणाले.