महिन्याला अडीच लाख साईभक्तांचा रेल्वेने शिर्डीला प्रवास!
साईबाबांचे जागतिक श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीला महिन्याला तब्बल 2.5 लाख साईभक्त रेल्वेने दर्शनासाठी येतात, अशी माहिती साईनगर रेल्वे स्थानकाचे प्रमुख अनिल शुक्ला यांनी दिली आहे

रेल्वेला मिळते 1.10 कोटींचे उत्पन्न!
साईबाबांचे जागतिक श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीला महिन्याला तब्बल 2.5 लाख साईभक्त रेल्वेने दर्शनासाठी येतात, अशी माहिती साईनगर रेल्वे स्थानकाचे प्रमुख अनिल शुक्ला यांनी दिली आहे.
दररोज 4 ते 5 रेल्वेगाड्या साईनगर रेल्वे स्थानकावर दाखल होतात.
गर्दीच्या हंगामात दररोज ~9,000, तर मंद काळात ~6,500 साईभक्त रेल्वेने ये-जा करतात.
यामुळे रेल्वेला महिन्याला 1 कोटी 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते!
13 राज्यांमधून साईभक्तांची रेल्वेने गर्दी!
आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, बेंगलोर, झारखंड, हिमाचल, दिल्ली, यूपी, एमपी, बंगाल, ओडिशा यासह अनेक राज्यांतील भक्त रेल्वेने शिर्डी गाठतात.
बदलती रेल्वे – वाढती सुविधा!
अनिल शुक्ला म्हणाले, “रेल्वेने साईभक्तांसाठी चांगल्या गाड्या, स्वच्छ वेटिंग रूम्स, एसी/नॉन-एसी हॉल्स, शुद्ध पाणी, आणि ‘जल आहार योजने’ अंतर्गत फक्त 15 रुपयांत नाश्त्याची सुविधा उपलब्ध केली आहे.”
91 कर्मचाऱ्यांची अविरत सेवा:
रेल्वे स्थानकावर 91 कर्मचारी भक्तांच्या सुविधेसाठी 24/7 काम करत आहेत.
दुपदरीकरण आणि नवीन इमारतींचे काम पूर्ण!
रेल्वे दुपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार असून, रेल्वे गाड्या आणि प्रवासी यांची संख्या आणखी वाढणार आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 3 नवीन निवासी इमारतींचे काम पूर्ण झाले आहे.
“शिर्डी दर्शन रेल्वेने – सोयीचं, स्वच्छ आणि भक्तिभावाने परिपूर्ण प्रवास!”