जि.प. – पं.स. गट गण रचना : जिल्ह्यात 88 हरकती, जामखेडमध्येच 40 तक्रारींचा पाऊस!
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप गट-गण रचनेवर जिल्हाभरातून 88 हरकती दाखल करण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप गट-गण रचनेवर जिल्हाभरातून 88 हरकती दाखल करण्यात आल्या आहेत.
एकट्या जामखेड तालुक्यात तब्बल 40 तक्रारी, म्हणजेच एकट्यानेच अर्धा जिल्हा मागे टाकला!
हरकत दाखल करण्याची अंतिम मुदत होती 21 जुलै संध्याकाळी 6 वाजेपर्यंत.
जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयात हरकतींचा ओघ पाहायला मिळाला.
तक्रारी कोणत्या स्वरूपाच्या होत्या?
“आमचं गाव या गटात हवं”
“पूर्वी ज्या गणात होतो, तिथंच ठेवा”
“ग्रुप ग्रामपंचायतीची गावं वेगवेगळ्या गणात गेली, पुन्हा एकत्र करा”
“पूर्वीचं नाव ठेवा, नवीन नाव नको!”
14 जुलै रोजी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी नवीन गट-गण रचना जाहीर केली होती.
2011 च्या जनगणनेच्या आधारे 75 जि.प. गट आणि 150 पं.स. गण निश्चित करण्यात आले होते.
तालुकानिहाय हरकती (Top 3):
जामखेड – 40
पारनेर – 13
अहिल्यानगर – 9
श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी – शून्य हरकती!
आता पुढचं काय?
हरकतींची छाननी होऊन अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल.
जिथे अनेकांनी एकाच गटासाठी तक्रारी केल्या आहेत, तिथे समन्वय साधणं मोठं आव्हान ठरणार आहे.
निवडणुकीपूर्वीच ‘गाव कुठल्या गणात?’ यावरून रंगलेलं राजकारण पाहायला मिळत आहे!