ही दोस्ती तुटायची न्हाय!  व्हॉट्सॲप ग्रुपवरून वर्गमित्राने वाचवला वर्गमित्राचा जीव 

 कुटुंबीय चिंतेत, हातात पैसे नाहीत... पण मग रंगतो तो मित्रत्वाचा खरा रंग!

ही दोस्ती तुटायची न्हाय! 

💖
 व्हॉट्सॲप ग्रुपवरून वर्गमित्राने वाचवला वर्गमित्राचा जीव 🙌

📍 अहिल्यानगर / सारोळा कासार – शाळेत १लीपासून १०वीपर्यंत एकत्र शिकलेले जुने मित्र, आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत… पण वर्गातला एक मित्र बाळासाहेब रुद्राक्षे आर्थिक अडचणीत. केडगावमध्ये छोटा व्यवसाय करून घर चालवणाऱ्या बाळासाहेबला अचानक हृदयविकाराचा झटका! 😨 डॉक्टर म्हणाले – शस्रक्रीया हवी… खर्च ३ ते ३.५ लाख!

👨‍👩‍👧‍👦 कुटुंबीय चिंतेत, हातात पैसे नाहीत… पण मग रंगतो तो मित्रत्वाचा खरा रंग! १९९३-९४ च्या बॅचचा व्हॉट्सॲप ग्रुप वाजतो – “ही दोस्ती तुटायची न्हाय!” – आणि सुरू होतो मदतीचा ओघ!

💸 सव्वा लाखांची मदत अगदी काही तासांत जमा! अजून मदतीची गरज आहेच, पण ही सुरुवातच भारी! कोणी पैसे पाठवले, कोणी हॉस्पिटलशी बोलले, कोणी डॉक्टरांचा सल्ला घेतला… म्हणजे मित्र म्हणजे फक्त हसणं-खिदळणं नाही, गरज पडली की देवदूतच! 😇

🎓 कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या या बॅचने खरंच “मित्र वनव्यामध्ये गरव्यासारखा” ही ओळ जिवंत केलीय! प्रा. अनंत राऊतांची कविता आठवलीच पाहिजे!

 

📢 मित्रांनो, अजून थोडी मदत हवी आहे… तुम्हीही या चांगल्या कार्यात सहभागी व्हा. कारण –
👉 “ही दोस्ती तुटायची न्हाय!” ❤️