“सुपा MIDC मधील उद्योगांचे प्रश्न आता होणार प्राधान्याने सोडवले!” – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचा स्पष्ट निर्देश
अहिल्यानगर – सुपा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना येणाऱ्या अडचणींवर आता जिल्हा प्रशासनाचे लक्ष केंद्रित! “उद्योगांना त्रास नको, कायदा-सुव्यवस्थाही ठणठणीत हवी”, असा स्पष्ट संदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिला.

अहिल्यानगर – सुपा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना येणाऱ्या अडचणींवर आता जिल्हा प्रशासनाचे लक्ष केंद्रित!
“उद्योगांना त्रास नको, कायदा-सुव्यवस्थाही ठणठणीत हवी”, असा स्पष्ट संदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिला.
मिंडा इंडस्ट्रीज येथे झालेल्या बैठकीत जिल्हा उद्योग मित्र समितीचा आढावा घेतला गेला.
या वेळी जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी, पोलीस, एमआयडीसी, विज विभाग, तहसीलदार, तसेच उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. आशिया यांचे महत्त्वाचे मुद्दे:
उद्योगांसाठी कायदा-सुव्यवस्थेचा मजबूत ढांचा आवश्यक
पोलिसांनी गस्त वाढवावी, सुरक्षा चोख ठेवावी
नेवासा औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती
वीजपुरवठा पुरेशा दाबाने व अखंडित मिळावा
निचऱ्याच्या कामांवर लक्ष केंद्रित करावे – पावसाचे पाणी कारखान्यांत नको!
उद्योगांना परवाने आता मैत्री पोर्टलवरून सहज उपलब्ध!
डॉ. आशिया यांनी उद्योजकांना डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्याचे आवाहन केले.
ट्रक टर्मिनल आणि कामगार रुग्णालयासाठी प्रस्ताव पुढे रेटा!
औद्योगिक गरजांची पूर्तता ही विकासासाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“उद्योग चालतील तेव्हाच रोजगार निर्माण होईल, म्हणून त्यांचे प्रश्न तातडीने सोडवणं गरजेचं आहे!” – डॉ. आशिया