शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा प्राधान्य – प्रत्येक स्कूल व्हेइकलमध्ये CCTV अनिवार्य!

अहिल्यानगर | २५ जुलै – आता शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांमध्ये सुरक्षा अधिक कडक होणार आहे. प्रत्येक स्कूल बस आणि वाहनामध्ये CCTV कॅमेरे अनिवार्य करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले आहेत

शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा प्राधान्य – प्रत्येक स्कूल व्हेइकलमध्ये CCTV अनिवार्य!

अहिल्यानगर | २५ जुलै – आता शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांमध्ये सुरक्षा अधिक कडक होणार आहे. प्रत्येक स्कूल बस आणि वाहनामध्ये CCTV कॅमेरे अनिवार्य करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले आहेत.

पोलीस अधीक्षक कार्यालयात नुकतीच पार पडलेल्या जिल्हा शालेय बस सुरक्षितता समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला महानगरपालिकेचे उपायुक्त विजय मुंडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, उपप्रादेशिक अधिकारी अनंता जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

घार्गे यांनी सांगितले की –

🔹
प्रत्येक बसमध्ये CCTV कॅमेरा कार्यरत असावा
🔹 ६ वर्षांखालील मुलांना आणणाऱ्या वाहनांमध्ये महिला कर्मचारी अनिवार्य
🔹 बसवर आपत्कालीन फोन नंबर स्पष्टपणे लिहिणे बंधनकारक
🔹 प्रत्येक शाळेने एक जबाबदार व्यक्ती नेमावी
🔹 शाळा-बस पार्किंगमध्येच विद्यार्थ्यांची चढ-उतार व्हावी

रस्त्यावरून धोकादायक पद्धतीने चढ-उतार थांबवायचंय!
रस्त्याच्या कडेला बस थांबवून चढ-उतार करणे धोकादायक आहे. यावर बंदी घालून, शाळांच्या आवारातच बस थांबवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

याशिवाय, अवैध वाहतुकीवर संयुक्त मोहीम राबवून दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. सर्व शाळांनी त्यांची परिवहन समितीची बैठक नियमित घेण्याचेही आदेश या वेळी दिले गेले.

सुरक्षिततेसाठी आता सगळ्या स्कूल व्हेइकल्समध्ये हाय अलर्ट!
ही माहिती पालक, शाळा प्रशासन आणि चालक-वहन धारकांसाठी अतिशय महत्त्वाची असून, लवकरच यावर कठोर अंमलबजावणी होणार आहे.

🔴 विद्यार्थ्यांची सुरक्षा आता सिस्टमवर, प्रत्येक हालचालीवर असेल नजर!