अहिल्यानगरमध्ये इतिहास घडतोय!
स्त्री शिक्षणाचे खरे प्रेरणास्थान - फुले दांम्पत्यांचा एकत्रित पुतळा

स्त्री शिक्षणाचे खरे प्रेरणास्थान – फुले दांम्पत्यांचा एकत्रित पुतळा
माळीवाडा वेस, अहिल्यानगर येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती एकत्रित पुतळा उभारला जाणार आहे – तोही एका भव्य चौथऱ्यावर!
भूमिपूजन करण्यात आलं उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या हस्ते.
त्यांनी स्पष्ट सांगितलं –
“हा पुतळा महाराष्ट्रात ‘स्त्री शिक्षणाचं प्रतीक’ म्हणून ओळखला जाणार! फुले दांम्पत्याचा आदर्श पुढच्या पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरेल!”
या ऐतिहासिक क्षणी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती –
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,
आमदार संग्राम जगताप,
माजी खासदार डॉ. सुजय विखे,
आणि जिल्ह्याच्या विविध क्षेत्रातील मान्यवर.
सर्वांनी श्री विशाल गणेश मंदिरात दर्शन घेतलं आणि फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन केलं.
समाजसुधारणेचा पाया रचणाऱ्या फुले दांम्पत्याचा हा पुतळा फक्त शिल्प नव्हे – विचारांची सजीव प्रेरणा आहे!
तुम्हीही या ऐतिहासिक घटनेचा भाग बना,
पोस्ट शेअर करा,
तुमचा अभिप्राय द्या
आणि
माळीवाडा वेसच्या या नव्या प्रेरणास्थळी नक्की भेट द्या!