शनिशिंगणापूर अॅप घोटाळा प्रकरणात नवीन वळण!

 १ ऑगस्टला विश्वस्त मंडळ धर्मदाय आयुक्तांपुढे मांडणार आपली बाजू

🚨
 शनिशिंगणापूर अॅप घोटाळा प्रकरणात नवीन वळण!
📅 १ ऑगस्टला विश्वस्त मंडळ धर्मदाय आयुक्तांपुढे मांडणार आपली बाजू

शनिशिंगणापूर | पोलीस न्यूज नेटवर्क

🛑 बनावट अॅप घोटाळ्यामुळे चर्चेत असलेल्या शनैश्वर देवस्थान ट्रस्टला तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
विश्वस्त मंडळाला १ ऑगस्ट २०२५ रोजी धर्मदाय आयुक्त अमोघ कलोती यांच्या समोर आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली आहे.

📲 अॅप घोटाळा, भरती प्रक्रियेत गडबड, आणि आर्थिक गैरव्यवहार…
या सगळ्या मुद्द्यांवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं!
काँग्रेसचे संभाजी माळवदे, भाजपचे ऋषिकेश शेटेविशाल सुरपुरीया, माजी विश्वस्त डॉ. वैभव शेटे, तसेच विविध संघटना यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.

🏛️ विधानसभेत आमदार विठ्ठल लंघे व सुरेश धस यांनी लक्षवेधी उपस्थित केल्यानंतर
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आश्वासन दिलं होतं.

💻 यानंतर अहमदनगर सायबर क्राईमने गुन्हा दाखल केला.
🔔 धर्मदाय कार्यालयाकडून ४१(डी) नोटीसही बजावण्यात आली.

🧑‍⚖️ अॅड. समीर जाधव यांनी २५ जुलैच्या सुनावणीला अवधी मागितला होता – तो आता १ ऑगस्टपर्यंत मिळालाय.
पण…
📌 आता सर्वांच्या नजरा त्या दिवशी होणाऱ्या सुनावणीवर खिळल्या आहेत!
विश्वस्त मंडळ काय स्पष्टीकरण देणार?
खरंच घोटाळा झालाय का?
कारवाई होणार की दिलासा मिळणार?

🔥 या प्रकरणाचा अंतिम निकाल संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरणार हे निश्चित!


 

🗓️ अपडेटसाठी फॉलो करत राहा
🗣️ तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा
🔁 ही पोस्ट शेअर करून माहिती पोहोचवा!