17 वर्षांपासून चालणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा उद्या निकाल येणार आहे!

 Malegaon Bomb Blast Case Update! 

🚨
 Malegaon Bomb Blast Case Update! 🚨

17 वर्षांपासून चालणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा उद्या निकाल येणार आहे!
सात आरोपींवर आरोप, ज्यात प्रमुख आहेत साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित.

💥 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावात रमजानच्या महिन्यात मोटरसायकलवर भीषण बॉम्बस्फोट झाला. यात 6 जण ठार, 101 जण जखमी झाले.
💥 तपासात ‘भगवा दहशतवाद’ संकल्पनेचा जन्म झाला, ज्यामुळे राजकीय आणि सामाजिक वाद वाढले.
💥 NIA ने सातही आरोपींना मृत्यूदंडाची मागणी केली आहे.
💥 या खटल्यात 323 साक्षीदारांनी साक्ष दिली, पण 40 ने नंतर साक्ष बदलली, 25 साक्षीदार मृत्युमुखी पडले.

साध्वी प्रज्ञा यांच्यावर बॉम्बस्फोटात सक्रिय सहभाग, मोटरसायकल आणि हत्यारं पुरवण्याचा आरोप आहे.
लेफ्टनंट कर्नल पुरोहित हा मास्टरमाईंड असल्याचा आरोप.

📅 उद्या, 31 जुलैला निकालाची ऐतिहासिक घोषणा होणार आहे!

ही घटना महाराष्ट्र आणि संपूर्ण देशासाठी मोठा धक्कादायक आहे. पीडित अजूनही न्यायाच्या वाटेवर आहेत आणि 17 वर्षांची ही लढाई आता निर्णायक टप्प्यावर आहे.

 

🔥 तुमचं काय मत? या निकालाने काय बदल होईल? कमेंट करा आणि शेअर करा!
#MalegaonBlast #JusticeForVictims #SadhviPragya #MetroPortalNews