Pune Update: मुस्लिम माजी सैनिकाच्या कुटुंबावर धमकी, पोलीस का निष्क्रीय? 

या घटनेचा निषेध करण्यासाठी ३१ जुलै रोजी येरवडा पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलनही करण्यात आले.

🚨
 Pune Update: मुस्लिम माजी सैनिकाच्या कुटुंबावर धमकी, पोलीस का निष्क्रीय? 🚨

पुणे – चंदननगरमध्ये एका माजी सैनिकाच्या मुस्लिम कुटुंबावर 70-80 समाजकंटकांनी रात्री १२ वाजताच्या सुमारास दहशत माजवली आहे. घरात घुसून महिलांवर, लहान मुलांवर त्रास देण्यात आला, शिवाय ‘तुम्ही रोहिंग्या आहात’ अशी भेदभावात्मक भूमिका घेतली गेली.

या घटनेचा तपास सुरू असून कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली, पण दबावामुळे पोलीस अजूनही कोणतीही कारवाई करत नाहीत असा आरोप आहे. त्यामुळे नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

माजी सैनिकांचे आजोबा व चुलते भारतीय सैन्यात काम करून निवृत्त झाले असून, त्यांना अनेक पदकांनीही सन्मानित करण्यात आले आहे. ५५ वर्षांहून अधिक काळ ते चंदननगर भागात राहतात.

या घटनेचा निषेध करण्यासाठी ३१ जुलै रोजी येरवडा पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलनही करण्यात आले.

 

🛑 अशा प्रकारच्या घटनांना लवकरात लवकर थांबवणं गरजेचं आहे, कारण समाजातील शांतता आणि ऐक्य यासाठी यावर त्वरित कारवाई व्हायला हवी.