**”दिव्यांग म्हणजे सवतीचं मूल?”

एसटी महामंडळाचा दुजाभाव, आता उघडपणे विरोध!**♿🚍

💥
**”दिव्यांग म्हणजे सवतीचं मूल?” — एसटी महामंडळाचा दुजाभाव, आता उघडपणे विरोध!**♿🚍

शिवनेरी आणि वातानुकूलित बसमध्ये आजही दिव्यांगांसाठी सवलत नाही!

📌 पिंपरी-चिंचवड अपडेट –
राज्य सरकारच्या आदेशानंतरही एसटी महामंडळ दिव्यांग प्रवाशांवर अन्याय करतंय, असा गंभीर आरोप प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे यांनी केला आहे.

🗓️ 27 जानेवारी 2024 रोजीच दिव्यांग कल्याण आयुक्तांनी शिवनेरी व वातानुकूलित बसमध्ये सवलत द्यावी, असा स्पष्ट आदेश दिला होता.
➡️ पण अजूनही कोणतीही अंमलबजावणी नाही!


🚫 महिला, जेष्ठ नागरिकांना सवलत… पण दिव्यांगांना नाही?

“दिव्यांगांच्या सवलतीवरून एसटीचं वागणं म्हणजे – आम्ही ‘सवतीचं मूल’ आहोत का?” – वाकचौरे यांचा सवाल!

✅ महिला सन्मान योजना
✅ जेष्ठ नागरिक योजना
✅ वयोश्री योजना
➡️ या सर्व योजना शिवनेरी व वातानुकूलित बसमध्ये लागू आहेत
❌ पण दिव्यांग व्यक्तींना मात्र सवलतीपासून वंचित ठेवलं जातंय


🔁 मागणी होती, आदेशही आले… तरीही शून्य अंमलबजावणी!

प्रहार आंदोलनाने दिव्यांगांसाठी आरक्षित आसन आणि सवलतीसाठी वर्षांपासून पाठपुरावा केला आहे.
आयुक्तांनी स्पष्ट आदेश देऊनही एसटी महामंडळाने त्याकडे दुर्लक्ष केलंय.

📢 आता पुन्हा नव्याने तक्रार दाखल करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ईमेलद्वारे तक्रारीची प्रत पाठवण्यात आली आहे.


⚠️ “जर दिव्यांग सवलती लागू केल्या नाहीत, तर राज्यभर तीव्र आंदोलन उभारू!”

➡️ असा इशारा प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्यावतीने देण्यात आलाय.


📣 ही बातमी शेअर करा… दिव्यांगांच्या हक्कासाठी आवाज उठवा!

 

#DivyangRights #STBusDiscrimination #ShivneriBias #MetroNews #InclusiveTransport #RajendraWakchaure #SocialJustice #DisabledLivesMatter