प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर ₹1.32 लाखाचं कर्ज!

सरकारचं ‘क्रेडिट कार्ड’ बेधुंद!

💸
 प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर ₹1.32 लाखाचं कर्ज! सरकारचं ‘क्रेडिट कार्ड’ बेधुंद!

📌 दिल्ली | Metro News Special

देशातल्या प्रत्येक व्यक्तीवर सध्या सरासरी ₹1,32,059.66 कर्ज आहे! म्हणजे पाळण्यातला बाळ असो की निवृत्त आजोबा – सरकारच्या कर्जाचा ओझा सर्वांच्या डोक्यावर समान!

📊 ही आकडेवारी ३१ मार्च २०२५ अखेरची असून, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (NSO) लोकसंख्या अंदाजावर आधारित आहे.
यामध्ये फक्त केंद्र सरकारचं कर्ज गृहित धरलं आहे. राज्यांचं नाही!


🔥 फक्त ४ वर्षांत व्याजाचा खर्च ३७% वाढला!

सरकारने घेतलेल्या कर्जावर फक्त व्याज भरण्यासाठी २०२५-२६ मध्ये ₹12.76 लाख कोटी खर्च होणार आहेत.
हेच व्याज २०२२-२३ मध्ये होतं ₹9.29 लाख कोटी — म्हणजे अवघ्या ४ वर्षांत तब्बल ३७.३५% वाढ!


🧾 सरकारचा प्लान काय?

सरकारनं फायनान्शियल कंट्रोल ठेवण्यासाठी २०२५-२६ मध्ये वित्तीय तूट GDP च्या ४.४% वर आणण्याचं उद्दिष्ट ठेवलंय.
हे यशस्वी झालं, तर:

✅ कर्ज वाढीला आळा
✅ व्याजाचा खर्च कमी
✅ कर भरणाऱ्यांवरील ताण कमी


😰 नाहीतर… सामान्य नागरिक भरपाई करणार?

विशेषत: जर करप्रणाली, खर्च कार्यक्षमता आणि सरकारी उसनवारींमध्ये सुधारणा केली नाही, तर
२०३१ पर्यंत सरकारी कर्ज GDP च्या ५०% वर जाईल – आणि परिणामी:

🚨 सामान्य जनतेवर कराचा भलामोठा बोजा येणार!


📲 विचार करा – तुम्ही काहीही न करता सरकारच्या उधारीचे व्याज भरताय!

 

शेअर करा आणि या आर्थिक सत्याची जाणीव सर्वांना करून द्या!