BREAKING | स्थानिक निवडणुकांना ग्रीन सिग्नल!

सुप्रीम कोर्टाने दिला मोठा दिलासा – २७% OBC आरक्षण कायम!

🟡
 BREAKING | स्थानिक निवडणुकांना ग्रीन सिग्नल! सुप्रीम कोर्टाने दिला मोठा दिलासा – २७% OBC आरक्षण कायम!

“निवडणुकीत आता कोणतीही अडचण नाही, कोर्टाचा स्पष्ट आदेश!”

📍 नवी दिल्ली:
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर सुप्रीम कोर्टाचा ग्रीन सिग्नल मिळाला आहे! न्यायालयाने सोमवार (४ ऑगस्ट) रोजी दिलेल्या ऐतिहासिक निकालात २७% ओबीसी आरक्षण कायम ठेवत, नवीन प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट केले.

✅ कोर्टाचा ठाम निर्वाळा:

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लवकरच!
  • ओबीसींसाठी २७% आरक्षण लागू राहणार.
  • नवीन प्रभाग रचना यथास्थित स्वीकारली!
  • न्यायालयाने दोन याचिका फेटाळल्या.

🧑‍⚖️ न्या. सूर्यकांत आणि न्या. एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांना आता मार्ग मोकळा झाला आहे.

🗣️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले:
“२०१७ प्रमाणेच निवडणुका होतील, हा निकाल मागासवर्गीय बांधवांसाठी मोठा विजय आहे!”

📌 ‘वॉर्ड रचना राज्याचा अधिकार आहे, कोर्ट त्यात हस्तक्षेप करणार नाही,’ असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

📉 राजकीय संघर्षाला पूर्णविराम!
महायुती, महाविकास आघाडी आणि शिंदे सरकार या सर्वांनी वेगवेगळ्या वेळेस प्रभाग रचनेत बदल केले. त्यामुळे निवडणुका वारंवार लांबवण्यात आल्या. पण आता सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे हा सगळा गोंधळ संपुष्टात आला आहे!

⚖️ पहिल्याच सुनावणीत निकाल
औसा नगरपालिकेच्या प्रभाग रचनेविषयी दोन याचिका दाखल झाल्या होत्या. पण कोर्टाने या दोन्ही याचिका फेटाळून, राज्य सरकारचा निर्णय वैध ठरवला.


 

📰 हीच बातमी मित्रांना शेअर करा आणि फॉलो करा Metro News ला – ट्रस्टेड अपडेटसाठी!
#OBCReservation #SupremeCourtVerdict #MaharashtraElections #MetroNews