BREAKING | जपानमध्ये ‘मिनी ट्रम्प’चा उदय! पारंपरिक पक्षांच्या वर्चस्वाला जबर धक्का!
कामिया यांचं नारा – “मेक जपान ग्रेट अगेन!” | यूट्यूबवरून संसदेत प्रवेश | आता ‘किंगमेकर’ होण्याच्या तयारीत!
टोकियो |
जपानचं राजकारण नेहमीच शांत आणि स्थिर मानलं जातं. मात्र आता याठिकाणी स्फोटक घडामोडी घडत आहेत! सोहेई कामिया नावाचे यूट्यूबर-राजकारणी अवघ्या ३ वर्षांत चर्चेतून संसदेत पोहोचले आहेत. आणि आता एलडीपी-सीडीपीसारख्या जुन्या पक्षांच्या वर्चस्वाला थेट आव्हान देत आहेत!
कोण आहेत कामिया?
वय: 47 वर्षे
पार्श्वभूमी: शिक्षक, नगरसेवक, एलडीपीचा माजी उमेदवार
प्रवास: यूट्यूब डिबेट्स → पक्ष स्थापनेपर्यंत
संसदेत जागा: 15+
त्यांचा अजेंडा स्पष्ट आहे:
- “जपान फर्स्ट”
- स्थलांतर आणि ग्लोबल अजेंड्याला विरोध
- पारंपरिक मूल्यांचा पुरस्कार
- लसीकरणावरील संशय
- “जागे व्हा, गुलामीपासून वाचा!”
कामिया म्हणतात:
“मी ‘मेक जपान ग्रेट अगेन’ असं का म्हणतोय? कारण जर आपण जागे झालो नाही, तर जपान एका गुलाम देशात रूपांतरित होईल!”
राजकीय विश्लेषक म्हणतात:
“कामिया यांची लोकप्रियता ही ट्रम्पप्रमाणे भावनिक, राष्ट्रवादी आणि सोशल मीडियावर आधारित आहे. ते आता जपानच्या राजकारणात किंगमेकर बनू शकतात.”
जपानसारख्या देशातही नव्या विचारांची लाट सुरू झाली आहे. तुम्हाला काय वाटतं – ‘कामिया’ जपानचे भविष्यातले पंतप्रधान ठरू शकतात का?
तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा!
#JapanPolitics #Kamya #MiniTrump #MakeJapanGreatAgain #MAGA #YouTuberToLeader #ViralNews #MetroNewsMarathi
