शनिवार आणि रविवारी रुग्णांसाठी मोफत योग शिबीर
ऍप्पल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नगरकरांच्या सेवेत सज्ज
आरोग्यसेवा हीच खरी जनसेवा, या ब्रीदाप्रमाणेच अत्याधुनिक सेवांसह नगरकरांच्या सेवेत ऍप्पल हॉस्पिटल सज्ज झालंय. ऍप्पल हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा रविवारी २४ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ३ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष मा. शरद पवार यांच्या संपन्न झाला. या प्रसंगी ज्येष्ठ नेते माननीय खा. यशवंतराव गडाखयांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. या वेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पारनेर चे आ. निलेश लंके, विधान परिषद सदस्य मा. अरुणकाका जगताप,हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, आ. संग्राम जगताप, आ. दादाभाऊ कळमकर आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते. ऍप्पल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ७० बेड्स ची सुविधा आहे. त्याचप्रमाणे १० बेड्स चा सुसज्ज अतिदक्षता विभाग आहे. सुसज्ज आणि अत्याधुनिक ऑपरेशन थेटर, अत्याधुनिक प्रसूती गृह, तद्न्य डॉक्टर्स, ओपीडी सुविधा, स्पेशल आणि सेमीस्पेशल रूम्स, स्वतंत्र, पुरुष आणि महिला जनरल वॉर्ड, २४ तास मेडिकल आणि पॅथालॉजिकल सेवा, उपलब्ध आहेत. ऍप्पल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये, लॅबोरेटरी, ईसीजी आणि एक्सरे सुविधा, अनुभवी स्टाफ, होमिओपॅथी उपचार सुविधा, सर्व हेल्थ पॉलिसी सुविधा, कॅशलेस सुविधा, ऍम्ब्युलन्स सुविधा ही उपलब्ध आहेत. ऍप्पल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मेडिसिन आणि भूलतज्ञ् विभागात, फिजिशियन डॉ. रविराज गवळी, भूलतज्ञ्, डॉ. अमोल दरोडे, सर्जरी विभागात न्यूरो सर्जन, डॉ. प्रशांत जाधव, जनरल सर्जन, डॉ. अशोक शिंदे, स्त्रीरोग आणि प्रसूती विभागात, स्त्रीरोग तज्ञ्, डॉ. यशोदीप सोनवणे, स्त्रीरोग तज्ञ्, डॉ. स्नेहल इंगळे, अस्थिरोग विभागात, ऑर्थोपेडिक सर्जन, डॉ. दीपक कळमकर, आणि डॉ. संदीप कोकरे तसेच, नेत्र रोग विभागात, नेत्र रोग तज्ञ्, डॉ. वैभव जासूद, आणि डॉ. चैताली काशीद , कान, नाक, घसा आणि फुफ्फुस विभागात, डॉ. वैजनाथ गुरवले, आणि फुफ्फुस आणि दमा विकार तज्ञ् डॉ. निलेश परजणे, आदी तज्ञ् डॉक्टर्स २४ तास सेवेसाठी सज्ज आहेत. त्याचप्रमाणे बालरोग विभागात, बालरोग तज्ञ् डॉ. सचिन सोलट आणि डॉ. शैलेश गडाख, किडनी विभागात, किडनी तज्ञ् डॉ. आनंद काशीद, आणितसेच त्वचा मानसोपचार विभागात त्वचारोग तज्ञ् डॉ. दहितुले, आणि मानसोपचार तज्ञ्, डॉ. सपकाळ आदी तज्ञ डॉक्टर्स रुग्णसेवेसाठी सज्ज आहेत. ऍप्पल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दर शनिवारी आणि रविवारी सकाळी ५ ते ७ मोफत योग आणि प्राणायाम शिबीर आणि सकाळी ७ ते १० आहार तज्ञांचा सल्ला आणि फिजिओथेरपीचे व्यायाम या विशेष सुविधा उपलब्ध आहेत.