मनसेच्या शिष्टमंडळाचे निवेदन

महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने खा शरद पवार यांना कोरोना आजारामुळे खाजगी हाॅस्पिटल मध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांना जी वाढीव रक्क्मेची बिले आली होती आणि  जी वसुली पात्र रक्कम शहरातील संबधित हॉस्पिटल कडुन वसुलीचे आदेश महानगर पालिकेने देऊन देखील संबधित 15 हॉस्पिटल ने तरी देखील कोरोना रुग्णांच्या खात्यावर जमा केली नसल्यामुळे रविवार दिनांक 24 जानेवारी रोजी  निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने खा शरद पवार यांना कोरोना आजारामुळे खाजगी हाॅस्पिटल मध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांना जी वाढीव रक्क्मेची बिले आली होती आणि  जी वसुली पात्र रक्कम शहरातील संबधित हॉस्पिटल कडुन वसुलीचे आदेश महानगर पालिकेने देऊन देखील संबधित 15 हॉस्पिटल ने तरी देखील कोरोना रुग्णांच्या खात्यावर जमा केली नसल्यामुळे रविवार दिनांक 24 जानेवारी रोजी  निवेदन देण्यात आले. कोरोना आजारावर शासनाने घालुन दिलेल्या नियमांच्या बाहेर जाऊन शहरातील 15 खाजगी हॉस्पिटलने 1 कोटी 13लाख रुपये बिलांची जादा आकारणी केली असे उपजिल्हाधीकरी समितीने आपल्या अहवालात नमुद केले आहे. गोर गरिब रुग्णांचे वाढीव बिलांचे पैसे परत मिळावे. या करीता मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांना देखील निवेदन दिल्याचे मनसेच्या पदाधिकारी यांनी निदर्शनास आणुन दिले.परंतु आज पर्यंत या सर्व हॉस्पिटल ने वाढीव बिलांची जादा रक्कम परत दिली नसल्यामुळे मनसेच्या पदाधिकारी यांनी खा शरद पवार यांना हि बिलांची रक्कम तुम्हीच परत मिळवुन द्या.  तुम्हीच तुमच्या संबधित मंत्री यांना लक्ष्य घालयला लावा. आणि  हा प्रश्न मार्गी लाऊन द्या अशी विनंती केली त्यावर खा. शरद पवार म्हणले कि मी आरोग्य मंत्री यांच्याशी या विषयावर बोलतो व गोरगरीब जनतेचा हॉस्पिटलच्या वाढीव बिलाचा पैसे परत करण्याचा प्रश्न मार्गी लाऊन देतो. असे आश्वासन दिले. यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा सचिव नितीन भुतारे,शहराध्यक्षय गजेन्द्र राशिनकर,महिला जिल्हाध्यक्ष्य ऍड. अनिता दिघे हे उपस्थीत होते. अशी माहीती मनसेचे नितीन भुतारे यांनी दिली आहे.