ब्रेकिंग! राहुल गांधींचा BJP आणि निवडणूक आयोगावर जबरदस्त हल्ला – “मतचोरीचा अणुबॉम्ब!”
राहुल यांच्या मते, महाराष्ट्रात 40 लाख बनावट मतदार यादीत समाविष्ट झाले आहेत.


दिल्लीमध्ये गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी असा स्फोटक आरोप केला की, 2024 लोकसभा निवडणुकीत BJP ने निवडणूक आयोगाच्या मदतीने देशभरात मोठ्या प्रमाणावर “मतचोरी” केली! 
राहुल गांधी म्हणाले –
“ही फक्त निवडणुकीतील फसवणूक नाही, तर संविधानावर थेट हल्ला आहे. देशभरात बनावट मतदार तयार केले गेले. हा लोकशाहीवर अणुबॉम्बसारखा हल्ला आहे!”
राहुल गांधींचे आरोप (कर्नाटकातील महादेवपूर विधानसभा मतदारसंघाच्या विश्लेषणावर आधारित):
बनावट मतदार 
खोटे/अवैध पत्ते 
एकाच पत्त्यावर अनेक मतदार 
अवैध फोटो 
फॉर्म 6 चा गैरवापर 
राहुल यांच्या मते, महाराष्ट्रात 40 लाख बनावट मतदार यादीत समाविष्ट झाले आहेत. मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 नंतर झालेली मतदानातील अचानक वाढ त्यांना संशयास्पद वाटत आहे. 

राहुल गांधींची चेतावणी:
“आज BJP सत्तेत आहे, पण एक दिवस विरोधक येतील. निवडणूक अधिकाऱ्यांनी जर गुन्हा केला असेल, तर कारवाई होईल. संविधानाचा पाया हादरवणाऱ्यांना माफी नाही!”
देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार:
फडणवीस यांनी राहुल गांधींवर तिखट टीका करताना म्हटले –
“मला वाटतं मतांची चोरी झाली नाही, पण राहुल गांधींच्या डोक्याची ‘चीप’ चोरीला गेली आहे. हार्ड डिस्क क्रॅश झाली आहे. ते रोज तेच बोलतात, वेगवेगळे आकडे देतात आणि पळून जातात.”
निवडणूक आयोगाचा इशारा:
कर्नाटक आणि महाराष्ट्रातील निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधींना सांगितले की, त्यांचे दावे खरे असतील तर शपथपत्रासह खोट्या मतदारांची यादी द्यावी. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चौकलिंगम यांनी स्पष्ट केले की, काँग्रेसने याआधी यादीवर कोणताही आक्षेप घेतला नव्हता.
सोशल मीडियावर चर्चा रंगली:
राहुल गांधींच्या या आरोपांमुळे X (Twitter), Instagram आणि WhatsApp ग्रुप्सवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही जणांना हे लोकशाहीचे संरक्षण वाटते, तर काहींना केवळ राजकीय ड्रामा. 
#ElectionScam #RahulVsBJP #BreakingNews #लोकशाही #BJP #Congress #मतचोरी #ViralNews 