गणपती बाप्पा पावला! म्हाडाचा धमाकेदार निर्णय – मुंबईत घराचं स्वप्न आता आणखी जवळ!
अलीकडेच म्हाडा कोकण मंडळाने घरं आणि 77 भूखंडांसाठी मेगा लॉटरी जाहीर केली होती.

गणपती बाप्पा पावला! म्हाडाचा धमाकेदार निर्णय – मुंबईत घराचं स्वप्न आता आणखी जवळ! 
मुंबई हाऊसिंग ड्रीम अपडेट – स्वप्न नगरीत घर घेणं म्हणजे आजकाल मिशन इम्पॉसिबल
कारण घरांच्या किमतींनी अक्षरशः आभाळ गाठलंय 
पण म्हाडा आहे ना! 
म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांमुळे हजारो लोकांनी आपलं “मुंबईतील घर” हे स्वप्न साकार केलंय.
अलीकडेच म्हाडा कोकण मंडळाने 


घरं आणि 77 भूखंडांसाठी मेगा लॉटरी जाहीर केली होती. 
20% सर्वसमावेशक योजना – 565 घरे
15% एकात्मिक योजना – 3,002 घरे
म्हाडा घरे – 1,677 घरे
आणि हो, या लॉटरीत 77 भूखंडांची विक्रीही होणार आहे! 
आधी या लॉटरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट होती. पण… दिलेल्या मुदतीत म्हाडाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. 
म्हणूनच, कोकण मंडळाने दिला मोठा दिलासा – अर्ज करण्यासाठी अतिरिक्त 15 दिवसांची मुदतवाढ! 
नवीन डेडलाइन:
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑगस्ट 2025
लॉटरी ड्रॉ तारीख – आधी 3 सप्टेंबर होती, आता 18 सप्टेंबर 2025
म्हाडा कोकण मंडळाच्या अधिकारी रेवती गायकर यांनी ही माहिती दिली असून, अजून अर्ज न केलेल्या लोकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. 
का आहे ही मोठी संधी?
मुंबईत घरांच्या प्रचंड किमतींपेक्षा खूपच कमी दरात घरे
पारदर्शक संगणकीय लॉटरी प्रक्रिया 
सर्वसामान्यांसाठी घराचं स्वप्न साकार करण्याची गॅरंटी!
जर तुम्ही घर घेण्याचं स्वप्न मनात ठेवून बसला असाल, तर आता गाडी चुकवू नका! अर्ज करा, बाप्पाच्या कृपेने लॉटरी लागेल कदाचित! 

तुमचं मत:
म्हाडाची ही मुदतवाढ तुमच्यासाठी गेमचेंजर ठरणार आहे का? कमेंटमध्ये सांगा! 

#MhadaNews #MumbaiHousing #MhadaLottery #DreamHome #MetroNews #GanpatiBappaMorya 