पॉलिटिकल ब्रेकिंग! भाजपला मोठा धक्का – शिंदे गटात इनकमिंग वाढलं!
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका लक्षात घेता

पॉलिटिकल ब्रेकिंग! भाजपला मोठा धक्का – शिंदे गटात इनकमिंग वाढलं! 
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्ष हालचालींना गती देतायत. पण सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलंय ते म्हणजे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात होणारे प्रवेश.
नवी चर्चा – आवताडे शिंदे गटात?
सोलापूर जिल्ह्यातील मोठं नाव असलेले आणि सहकार क्षेत्रात मजबूत पकड ठेवणारे बबनराव आवताडे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे.
विशेष म्हणजे बबनराव आवताडे हे भाजपचे पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांचे काका आहेत. त्यामुळे हा प्रवेश झाल्यास भाजपला मोठा धक्का बसणार आहे. 
भेटीगाठी आणि हालचाली
शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील नुकतेच मंगळवेढ्यात जाऊन बबनराव आवताडे यांची भेट घेऊन आले.
याशिवाय काही दिवसांपूर्वी करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप (जे आवताडेंचे नातेवाईक आहेत) शिंदे गटात दाखल झालेत. त्यामुळे या प्रवेशाला आणखी गती मिळाल्याचं बोललं जातंय.
शिंदे गटाचे निकटवर्तीय मंगेश चिवटे हे देखील आवताडे यांच्या प्रवेशासाठी आग्रही आहेत.
सहकार क्षेत्रातील मोठा चेहरा
बबनराव आवताडे यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष म्हणून काम केलंय.
त्यांची सहकारी संस्थांमध्ये चांगली पकड असल्याने जर ते शिंदे गटात गेले तर
सोलापूरमध्ये शिंदे गटाला सहकार क्षेत्रातील मोठं बळ मिळणार आहे. 
यामुळे शिंदे गटाला केवळ राजकीय नाही तर आर्थिक-सहकारी ताकद देखील मिळणार आहे.
याचा राजकीय अर्थ काय?
भाजपसाठी सोलापूरमध्ये मोठं नुकसान
शिंदे गटाची ताकद सहकार क्षेत्रात वाढणार
स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये समीकरणं पालटण्याची शक्यता
सोशल मीडियावर या चर्चेला जोरदार उधाण आलंय –
काही म्हणतायत, “शिंदे गट दिवसेंदिवस मजबूत होतोय!” 
तर काही म्हणतायत, “भाजपला घरबसल्या मोठा धक्का बसणार!” 
तुमचं काय मत आहे?
बबनराव आवताडे शिंदे गटात गेले तर सोलापूरचं राजकारण कसं बदलेल?
कमेंटमध्ये नक्की लिहा 

#MetroPortal #PoliticalUpdate #EknathShinde #BJP #SolapurPolitics #LocalElections
नवी चर्चा – आवताडे शिंदे गटात?
भेटीगाठी आणि हालचाली
सहकार क्षेत्रातील मोठा चेहरा