जामखेड LIVE अपडेट | नान्नज गावात गँगवार स्टाईल राडा!
जामखेड तालुक्यातील नान्नज गावात रविवारी (24 ऑगस्ट) अक्षरशः
Share
जामखेड LIVE अपडेट | नान्नज गावात गँगवार स्टाईल राडा!
जामखेड तालुक्यातील नान्नज गावात रविवारी (24 ऑगस्ट) अक्षरशः चित्रपटातल्या सीनसारखा राडा झाला . तब्बल 14 जणांच्या टोळक्याने तलवार, कोयता, लोखंडी गज, काठ्या घेऊन गावातल्या 7 जणांवर भयंकर हल्ला केला. यात दोन जणांची प्रकृती गंभीर असून, हल्ल्यात जखमींमध्ये महिलांचाही समावेश आहे.
पोलिसांनी मिळवलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी “तुम्ही आमची दहशत संपवता? गाव बंद करून भाषणं करता? त्यापेक्षा आम्हीच तुम्हाला संपवतो!” असे म्हणत सरळ तलवारीने, कोयत्याने रक्तरंजित हल्ला केला.
या प्रकरणी वैभव विजय साबळे, सार्थक विजय साबळे, अभय कृष्णाराजे भोसले, ओम चंद्रकांत गोरे, विजय शंकर साबळे, साईनाथ शंकर रजपूत, नरेंद्र शहाजी सोनवणे, कल्याण पांडुरंग मोहळकर, सोमनाथ काशिनाथ शिंगटे (रा. नान्नज), निलेश माने, किरण जगदाळे (रा. महारूळी), हर्षद प्रताप काकडे (रा. बोर्ले) आणि इतर दोन अनोळखी आरोपी अशा एकूण 14 जणांवर खुनाचा प्रयत्न व अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अभिजीत संपत साळवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ यशदिप याला आरोपींनी प्रथम बाजारतळावर जखमी केले. त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना आरोपींनी त्यांची गाडी अडवून, काचा फोडून, गाडीत असलेल्या सर्वांना मारहाण केली.
जखमींमध्ये – अभिजीत संपत साळवे, यशदिप संपत साळवे, आदर्श सुनील साळवे, दिग्विजय सोनवणे, सद्दाम पठाण, रतन साळवे व रेषमा साळवे या सात जणांचा समावेश आहे.
यामध्ये आरोपींनी 27 हजार रुपये रोख, मोबाईल व गाडीची किल्ली लंपास केली. शिवाय “आमच्या नादी लागलात तर जिवंत सोडणार नाही!” अशी धमकी देत आरोपी मोटरसायकलवरून पसार झाले.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे आणि पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी धाव घेतली. सध्या एका आरोपीस अटक झाली असून, पोलीसांच्या तीन पथकांकडून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
️ या घटनेमुळे नान्नज परिसरात तणाव निर्माण झाला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मेट्रो न्यूज अपडेट नान्नज गावात गँगवार! तलवारी, कोयते, लोखंडी गज घेऊन टोळक्याचा हल्ला! सात जण गंभीर जखमी, दोनांची प्रकृती चिंताजनक! पोलिसांचा सर्च ऑपरेशन सुरू