हिंद सेवा मंडळाचा अभूतपूर्व पेच!
अरेरे..! जिल्ह्यातील बहुचर्चित हिंद सेवा मंडळ आज अक्षरशः दिशाहीन झालंय.
हिंद सेवा मंडळाचा अभूतपूर्व पेच! ![🚨]()
अरेरे..!
जिल्ह्यातील बहुचर्चित हिंद सेवा मंडळ आज अक्षरशः दिशाहीन झालंय. धर्मदाय आयुक्तांनी संस्थेची घटनादुरुस्तीच नाकारल्याने मंडळाचा संपूर्ण कारभार वादग्रस्त ठरला आहे.
२० ऑगस्ट २०२५ रोजी दिलेल्या निकालानंतर परिस्थिती अधिकच गोंधळलेली आहे.
-
ज्यांच्या आधारावर मंडळ चालत होतं त्या दुरुस्तीला आता अमान्य ठरवलं गेलंय.
-
त्यामुळे सार्वत्रिक निवडणुका, सभासद वगळणे, नवीन सभासद घेणे हे सगळेच निर्णय बोगस ठरले आहेत.
-
अगदीच मोठा प्रश्न असा की
आता खरंच मंडळाचा कारभारी कोण? ![🤔]()
पार्श्वभूमी काय आहे?
१९९४ साली स्थापन झालेल्या मंडळाने अनेक वेळा बदल अर्ज दाखल केले, पण त्यात गंभीर त्रुटी राहिल्या.
२०११ पासून २०२५ पर्यंत अनेक अर्ज दाखल झाले, काही मागे घेण्यात आले, काहीवरच कागदपत्रं न देता गप्प राहण्यात आलं.
अखेरीस २०२५ मध्ये धर्मदाय आयुक्तांनी सर्व दुरुस्त्या फेटाळल्या आणि मंडळ पूर्णपणे “शून्यावर” आलं!
मोठा परिणाम :
नोकरी भरतीवर पेच – ७ ऑगस्ट रोजी १४ पदांसाठी झालेली भरती नियमबाह्य ठरते का? कारण ज्यांनी सही केली तेच पदाधिकारी नियमबाह्य आहेत!
शिक्षक सभासद काढले अन् घरातील नवे घेतले – हा निर्णयही आता रद्द ठरेल. जुन्या शिक्षकांना पुन्हा मतदानाचा हक्क मिळू शकतो.
कारभारी मंडळ कोण? – पदाधिकारीच नियमबाह्य असल्याने आता प्रशासक नेमल्याशिवाय गाडं पुढे सरकणारच नाही.
मंडळाचा जिल्ह्याबाहेरील विस्तार – हा ठरावही अपुऱ्या कागदपत्रांमुळे नाकारला गेला.
तीन हजारांची कटींगची कुजबुज :
मंडळातील शाळांमध्ये दरवेळी तीन हजार रुपये गोळा होतात, असा आरोप. “कच्चा चिठ्ठा” या नावाने गोळा होणाऱ्या रकमा कुठे जातात? कुणालाच स्पष्ट सांगता येत नाही. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मात्र गप्प बसले आहेत. ![😶]()
आता पुढे काय?
जाणकार सांगतात की
प्रशासक नेमल्याशिवाय हिंद सेवा मंडळाला योग्य मार्गावर आणणं अशक्य आहे.
तीन वर्षांच्या कार्यकाळावर पाच वर्षांचा ताबा घेण्याचा प्रयत्न नियमबाह्य ठरल्याने आता मूळ घटनेप्रमाणेच दरवर्षी निवृत्ती व नव्या निवडणुका होणं बंधनकारक ठरेल.
आजची स्थिती :
-
पदाधिकारी नाहीत!
-
निर्णय वादग्रस्त!
-
नोकरी भरतीवर प्रश्नचिन्ह!
-
सभासदत्वावर गोंधळ!
-
विस्तार नामंजूर!

जिल्ह्यातील बहुचर्चित हिंद सेवा मंडळ आज अक्षरशः दिशाहीन झालंय. धर्मदाय आयुक्तांनी संस्थेची घटनादुरुस्तीच नाकारल्याने मंडळाचा संपूर्ण कारभार वादग्रस्त ठरला आहे.
२० ऑगस्ट २०२५ रोजी दिलेल्या निकालानंतर परिस्थिती अधिकच गोंधळलेली आहे.
पार्श्वभूमी काय आहे?
१९९४ साली स्थापन झालेल्या मंडळाने अनेक वेळा बदल अर्ज दाखल केले, पण त्यात गंभीर त्रुटी राहिल्या.
मोठा परिणाम :
नोकरी भरतीवर पेच – ७ ऑगस्ट रोजी १४ पदांसाठी झालेली भरती नियमबाह्य ठरते का? कारण ज्यांनी सही केली तेच पदाधिकारी नियमबाह्य आहेत!
शिक्षक सभासद काढले अन् घरातील नवे घेतले – हा निर्णयही आता रद्द ठरेल. जुन्या शिक्षकांना पुन्हा मतदानाचा हक्क मिळू शकतो.
कारभारी मंडळ कोण? – पदाधिकारीच नियमबाह्य असल्याने आता प्रशासक नेमल्याशिवाय गाडं पुढे सरकणारच नाही.
मंडळाचा जिल्ह्याबाहेरील विस्तार – हा ठरावही अपुऱ्या कागदपत्रांमुळे नाकारला गेला.
तीन हजारांची कटींगची कुजबुज :
आता पुढे काय?
आजची स्थिती :
Metro Portal वर ही धक्कादायक बातमी व्हायरल करा!