जय हिंद फाऊंडेशन तर्फे या परिसरात तब्बल 21 वटवृक्षांची लागवड करण्यात आली
Share
#सदोबाचा_डोंगर_हिरवाईने_बहरणार!
अहिल्यानगर तालुक्यातील ससेवाडी आगडगाव-कोल्हार रोडवरील सदोबाचा डोंगर आणि वाळूचा डेंबा परिसर आता हिरवाईने नटणार आहे! जय हिंद फाऊंडेशन तर्फे या परिसरात तब्बल 21 वटवृक्षांची लागवड करण्यात आली असून, हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाबरोबरच पर्यटनालाही नवा श्वास देणार आहे.
या परिसरात आधीपासूनच समृद्ध वन्यजीवसृष्टी आहे. उन्हाळ्यात वन विभागाच्या वतीने पानवठ्यात पाणी सोडलं जातं. त्यामुळे येथे पाणी प्यायला येणाऱ्या प्राण्यांना आता सावलीचा आधार मिळणार आहे. याचबरोबर यात्रेकरूंनाही उन्हाळ्यात थंडगार छाया लाभणार आहे.
जय हिंद फाऊंडेशनचे शिवाजी पालवे म्हणाले – “सदोबाचा डोंगर हा गर्भगिरी पर्वतरांगेतील सर्वात सुंदर भाग आहे. येथून आगडगाव काळभैरवनाथ, कोल्हुबाई माता गड, सीना नदीचा उगमस्थान आणि महादेव मंदिराकडे हजारो भक्त प्रवास करतात. वृक्षलागवड ही फक्त पर्यावरण रक्षणाची पायरी नाही, तर यात्रेकरूंना व पशुपक्ष्यांना दिलासा देणारी एक मोठी सेवा आहे.”
माजी सरपंच संजय ससे यांनी सांगितलं – “या उपक्रमामुळे सदोबाचा डोंगर हिरवाईने बहरून पर्यावरणासोबत पर्यटनालाही चालना मिळेल.”
विशेष म्हणजे, कोल्हार गावच्या डोंगरावर आता 25 वटवृक्षांचे पॉईंट तयार करण्यात आले आहेत. वडाची फळं पक्ष्यांसाठी खाद्य ठरणार असून, पानवठ्यामुळे पाण्याची सोय उपलब्ध असल्याने पशुपक्ष्यांचं जीवन अधिक सुखकर होणार आहे.
या उपक्रमात कोल्हार गावचे ज्येष्ठ शेतकरी रखमाजी पालवे, आजिनाथ पालवे, भाऊ पालवे, ससेवाडीचे माजी सरपंच संजय ससे, चेअरमन बाबा ससे, रोहिदास ससे, सावित्री ससे, संकेत जरे, सचिन जरे, अरुण ससे, दत्तू जरे, व्यंकटेश आठरे, तसेच जय हिंद फाऊंडेशनचे कार्यकर्ते शिवाजी पालवे, सचिन पालवे, संतोष मगर, लक्ष्मण ससे यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे – सदोबाचा डोंगर हिरवागार होणार वन्यजीवांना सावली व अन्न मिळणार यात्रेकरूंना उन्हापासून दिलासा पर्यटनाला नवी दिशा
ग्रामस्थांनी जय हिंद फाऊंडेशनच्या या कामाचं मनापासून कौतुक केलं आहे.
#MetroNews वरून तुम्हाला काय वाटतं – अशा उपक्रमांनी खरंच आपलं पर्यावरण व पर्यटन वाचवता येईल का? कमेंटमध्ये नक्की सांगा!