रायगडच्या अदिती तटकरे “तरुणाईचा आदर्श २०२१”पुरस्काराच्या मानकरी… 

श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे सन्मानित

रायगड : श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे तरुणाईचा आदर्श अर्थात युवा शक्तीच्या आयडॉल तसेच उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क या विभागांच्या राज्य मंत्री व रायगडच्या पालकमंत्री मा. कु.आदितीताई सुनील तटकरे यांचा तरुणाईचा आदर्श पुरस्कार देऊन *सन्मान* करण्यात आला.  मंत्रिपदाचा आजपर्यंतचा त्यांचा प्रवास सगळ्यांनाच थक्क करणारा आहे. त्याहीपेक्षा थक्क करायला लावणारे आहे त्यांचे कर्तृत्व! प्रत्येक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याची आपली हातोटी.

Also see this and subscribe

कोरोना काळ असो किंवा निसर्ग चक्रीवादळ परिस्थिती असो आदितीताई यांनी राजकारण न करता समाजसेवेचा वसा घेऊन  सदैव दिवस /रात्र  सर्वसामान्य जनतेच्या मदतीला तत्परतेने हजर राहिल्या आहेत. अशा पालकमंत्री रायगडवासियांना लाभल्या आहेत हे रायगडकरांचे भाग्यच. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे मा. कु. आदितीताई सुनील तटकरे यांना तरुणाईचा आदर्श पुरस्कार २०२१* ने आज सन्मानित करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी या उपस्थित होत्या. मा. कु. आदितीताई सुनील तटकरे  तसेच राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रकाशभाई कोळी, महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, राजेश जाधव, विजय दुन्द्रेकर, सुरेश भोईर, ओमकार महाडिक व सदाशिव मोरे, सचिन गायकवाड, मनोज पडवळ आदी उपस्थित होते.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.