१ लाख ११ हजाराचा लग्नाचा बस्ता अवघ्या ११ हजार २१ रुपयात.

काक परिवार आणि कुबेर उद्योग समूहात करार.

 

ऋषिकेश राऊत

अहमदनगर प्रतिनिधी :-

ऑनलाईन वस्तू विक्री आणि मल्टी लेव्हल मार्केटिंग मध्ये अग्रेसर असलेल्या काक इकॉनॉमिक या उद्योग समूहाने नगरमधील कुबेर मार्केटचे प्रमुख श्रीवेश पतके यांच्याशी माल पुरविण्यासाठी करार केलाय. इलेक्ट्रॉनिक्स , होम अप्लायन्सेस मध्ये अग्रेसर असलेल्या कुबेर, मार्केट, कुबेर फर्निचर्स आणि कुबेर एम्पॉर्टस या आस्थापनांनी थोडक्या कालावधीत नगरचे नाव राज्यभर मोठे  केले. आता हा उद्योग समूह काक परिवाराशी जोडला गेला आहे . होलसेल दरात रिटेल वस्तू विक्री करण्याची ख्याती असलेल्या कुबेर ने काक परिवाराशी करार करून ऑनलाईन वस्तू विक्री क्षेत्रात पदार्पण केले आहे.

नगरविषयी मला नेहमीच प्रेम जिव्हाळा असल्याने आणि नगरला आपण आपले माहेर समजतो त्यामुळे आपण कुबेर उद्योग समूहाला आपण सोबत घेत असल्याची माहिती काक परिवाराचे कुटुंब प्रमुख किशोर काकडे  यांनी सांगितले. यावेळी ऍड संजय झवेरी  काक परिवाराचे नगर जिल्हा प्रमुख गौरव राऊत, नगर जिल्हा नाभिक  समाज संघटनेचे अध्यक्ष  शांताराम राऊत,  कुबेर उद्योग समूहाचे श्रीप्रसाद पतके, श्री विशाल पतके,  श्री चरण पतके उपस्थित होते.

ऑन लाईन वस्तू विक्री क्षेत्रात अमेझॉन , फ्लिप कार्ड शी स्पर्धा करून मोठा नावलौकिक मिळवलेल्या काक परिवाराच्या महा राज्य माय मार्ट या सेल पोर्टल द्वारे मोठी उलाढाल केलीय. ऑनलाईन मार्केटिंग द्वारे काक परिवाराचे  मारुती काकडे यांनी ७५ मारुती एक्स्प्रेसोगाड्या  २५०० बुलेट गाड्या वाटल्या आहेत. पदार्पणानिमित्त आणि कोरोनानंतर गोर गरीब जनतेचे हित लक्षात घेऊन किशोर काकडे यांनी केवळ ११ हजार २१ रुपयात एक लाख ११ हजार रुपयांचा लग्नाचा इलेक्ट्रॉनिक वस्तू , फर्निचर आणि भांड्यांचा  बस्ता  बांधून देण्याचा निर्णय घेतलाय, महा राज्य माय मार्ट चे सदस्य होणाऱ्या आणि ज्या नववधूचे लग्न डिसेम्बर नंतर होणार आहे. अशा लोकांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. भांडे वस्तू आणि फर्निचरची डिलेव्हरी लाभार्थ्यांना थेट लग्न मंडपात किंवा मंगल कार्यालयातच मिळणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी काक इकॉनॉमिक डॉट कॉम या वेबसाईटवर संपर्क साधावा असे आवाहन काक यांनी यावेळी केले.