लग्नाचं आमिष दाखवून एका 42 वर्षीय शिक्षिकेची तब्बल ₹22 लाख 13 हजारांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Share
अहिल्यानगरमधून मोठी धक्कादायक बातमी!
लग्नाचं आमिष दाखवून एका 42 वर्षीय शिक्षिकेची तब्बल ₹22 लाख 13 हजारांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
काय घडलं?
अहिल्यानगरमधील शिक्षिकेची ओळख 2019 मध्ये ‘येवले अमृततुल्य’ चहा दुकानात मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या अक्षय रामदास काळे (रा. काळेवाडी, अस्तगाव, ता. पारनेर) याच्याशी झाली. सुरुवातीला साधी ओळख असलेलं नातं हळूहळू प्रेमात बदललं. अक्षय काळेने शिक्षिकेला लग्नाचं वचन दिलं आणि विश्वास बसवून पैशांची उकळपट्टी सुरू केली.
पैसे कसे उकळले?
अक्षय आणि त्याच्या कुटुंबीयांनी वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांखाली पैशांची मागणी केली. प्रेमाच्या नात्यावर विश्वास ठेवून शिक्षिकेने त्याला एकूण ₹22,13,000 दिले. एवढंच नाही, अक्षयने शिक्षिकेच्या पैशातून चालणारी चहा दुकानाची शाखा परस्पर विकून टाकली! त्यानंतर तो लग्नाच्या बाबतीत टाळाटाळ करू लागला.
शेवटी काय झालं?
जेव्हा शिक्षिकेला आपल्या फसवणुकीची जाणीव झाली तेव्हा तिने धाडस करून थेट तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली. शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय काळे, त्याची आई आणि बहीण यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षिकेने पोलिसांना सांगितलं की, “या पैशासाठी घेतलेलं कर्ज आजही माझ्या पगारातून वसूल होत आहे.”
समाजात खळबळ
ही घटना समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रेम, लग्न, विश्वास अशा संवेदनशील भावनांचा गैरफायदा घेत थेट कोटींच्या आसपासची फसवणूक केल्यामुळे सगळीकडे चर्चेला उधाण आलंय. सध्या पोलिस अधिक तपास करत आहेत.
नव्या पिढीच्या भाषेत:
“लग्नाचं वचन म्हणजे ATM कार्ड नाही रे भावा! फक्त ‘I Love You’ बोलून कोणी करोडपती होतंय, तर मग हा देश वेगळ्या रस्त्यावर गेला असता! शिक्षिकेच्या प्रेमावर विश्वास ठेऊन पैशांची लूट करणं म्हणजे Scam 2025 – Amruttulya Edition!
Metro News चा सल्ला:
अशा प्रकारच्या प्रेमाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहा. कुणीही कितीही जवळचं वाटलं तरी पैशांच्या बाबतीत लेखी पुरावा, खात्री आणि जागरूकता ठेवणं गरजेचं आहे.