हेल्थी लाईफ फिटनेस क्लब चा उपक्रम….

दानशुर व्यक्तींकडून कोरोना बाधित व गरजुंना भोजन

अहमदनगर:

 

           अहमदनगर येथील हेल्थीलाइफ फित्नेस  क्लब मधील सर्व सहकारी एकत्र येऊन तसेच नगर मधील दानशूर व्यक्ती यांनी विनामूल्य भोजन सेवेचे आयोजन अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटल तसेच खाजगी हॉस्पिटल म्हणजे कोरोना संक्रमित व्यक्ती व त्यांच्या गरजू लोकांना मोफत भोजन सेवेच्या आयोजन करण्यात येत आहे नगर शहरामध्ये अनेक हॉस्पिटलमध्ये रुग्ण व त्यांचे नातेवाईक सकाळपासून उपचारासाठी नगर शहर तसेच बाहेर गावावरून येत आहे परंतु लॉग डाऊन असल्याने त्यांच्या भोजनाची सोय होत नाही म्हणून याचे आयोजन नगर मधील युवक करत आहे. 

 

 

          यामध्ये हेल्थी लाइफ फिटनेस क्लब चे राहुल डागा, नितीन भोसले ,सौ दिपाली भोसले, किरण ब्रम्हणकर, तरन्नुम सय्यद मॅडम, प्रशांत शिरसाठ, अमित पगारे, सचिन अवघडे, अंबादासजी इंगळे सर,  संजय येलमामे, सविता शिंदे ,प्रसन्न ब्राह्मणकर ,सचिन शेठ बारस्कर ,सादिक शेख ,बापूसाहेब खिळे, नितीन कडू साहेब,  अमोल ननावरे,  सुरेश आदमाने ,अमोल पगारे, अमोल माळी ,शितल ओहोल, दत्तात्रय चितळकर ,भालचंद्र घेवरीकर ,सचिन शेठ दहिवाळ, अनिल उदावंत, शिवाजीराव काटे साहेब, या सर्वांनी मिळून सहकार्य करून मोफत भोजनाचे आयोजन केले आहे यास आज नगर शहरामध्ये खूप लोकांनी समाधान व्यक्त केले..
अहमदनगर