येत्या २८ मे ला नगर होणार ५३१ वर्षांचे…

नगरच्या स्थापना दिनानिमित्त विविध ऑनलाईन स्पर्धा

अहमदनगर:

    ऐतिहासिक अहमदनगर शहरच्या ५३१व्या स्थापना दिनानिमित्त “नगर जल्लोष” (ट्रस्ट ), “उडान फाऊंडेशन” च्या वतीने आणि “अवनिश क्रिएशन” च्या सहकार्याने २१  मे ते २३ मे या कालावधीत विविध ऑनलाईन स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धा सर्वांसाठी मोफत आणि खुल्या आहेत, अशी माहिती उडान फाऊंडेशन चे जितेंद्र यांनी दिलीय.  स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी http://bit .ly/ngrjallosh11 या लिंकवर जाऊन आपले नाव २० मे पर्यंत नावनोंदणी करावी.
अहमदनगर शहरच्या ५३१व्या स्थापना दिनानिमित्त २१ मे रोजी निबंध स्पर्धा होणार असून  सहभागी स्पर्धकांनी, “आपलं अहमदनगर” या विषयावर २५० ते ३०० शब्दांत निबंध लिहायचा आहे. हा निबंध nagarjallosh2011@gmail.com ID या संकेतस्थळावर पाठवायचा आहे.
अहमदनगर शहरच्या ५३१व्या स्थापना दिनानिमित्त २२ मे रोजी रांगोळी स्पर्धा होणार आहे. स्पर्धकांनी रेखलेली रांगोळी ९९२२१४०१२० या क्रमांकार्व्ह पाठवायची आहे. २३ मे रोजी मेहंदी स्पर्धा होणार असून स्पर्धकांनी मेहंदी ९८६०६१२०४५ या क्रमांकावर पाठवायची  आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सागर बोगा यांनी केलंय.

 

 

 

      तसेच प्रथम तीन विजेत्यांना अवनीश क्रिएशन तर्फे अहमदनगर शहराच्या वास्तूची प्रतिकृती भेट म्हणून देण्यात येणार आहे. सहभागी स्पर्धकांना ऑनलाईन सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे .  स्पर्धेचा निकाल २८ मे रोजी सायंकाळी ६ नंतर नगर जल्लोष च्या लिंकवर ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती बोगा यांनी दिली.