नाशिक -पंढरपूर कोरोना जनजागृती सायकल रॅली चे नगर मध्ये स्वागत

नाशिककर करतात दर आषाढीला सायकलवारी

 

 

 

       

 

 

        नाशिक वरून पंढरपूर कडे जाणाऱ्या कोरोना जनजागृती सायकल रॅली चे स्वागत प्रथम महापौर भगवान फुलसौदर आणि  महाराष्ट्र केटरिंग असोसिएशन चे संचालक राजेंद्र उदागे यांचे हस्ते करण्यात आले या वेळी फटाका व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, पत्रकार संदीप रोडे व सचिन महाशिकारे उपस्थित होते.

 

हे ही पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा :

 

         सध्याच्या परिस्तिथी मध्ये कोरोना बाबत जनजागृती करणे ही काळाची गरज आहे .  आपण सर्वजण व्यापारी असून देखील सामाजिक बांधिलकीची जाणीव आपल्याला आहे या बाबत आपले मी मनापासून अभिनंदन करतो.  अशा शब्दात भगवान फुलसौंदर यांनी या उपक्रमाक कौतुक केले.

 

 

              सदर सायकल रॅली ही नाशिक वरून निघाली असून पहिला  मुक्काम अहमदनगर येथील कोहिनुर मंगल कार्यालय झाला .  एका दिवशी 165 कि. मी. सायकलिंग करण्यात आले असून  असून दुसरा  मुक्काम टेम्भूर्णी येथे असून तिसर्या दिवशी पंढरपूर येथे दर्शन होणार आहे. अशी माहिती नाशिक जिल्हा लॉन असोसिएशन चे अध्यक्ष संदीप काकड यांनी दिली. सदर रॅली मध्ये डॉक्टर, इंजिनियर व व्यापारी असे सर्व वर्गातील असून रॅली मध्ये  सहभागी झाले आहेत. यात  रत्नाकर  भांबरे, डॉ. जयराम डिकले, भास्कर सोनवणे, विक्रम खैरनार अशा  एकूण 20 ते 25 सायकल स्वारांचा समावेश आहे.