दिमाखदार आतिषबाजीत ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित , भारतीय दलामध्ये केवळ 25 सदस्यच

कोरोनामुळे पहिल्यांदाच यावेळी प्रेक्षकांविना हा समारंभ

                             आजपासून भारत टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपली मोहीम सुरू करत आहे. यावेळी देशाची 125 खेळाडूंची टीम टोकियोला गेली आहे. वेगवेगळ्या खेळांमध्ये खेळाडू भाग घेतील.

 

 

 

                                 पहिल्या दिवशी भारत तिरंदाजीत भाग घेतला. तिरंदाजीत महिलांच्या वैयक्तिक गटात दीपिका कुमारी प्रमुख खेळाडू आहे तिने क्रमवारीत नववा क्रमांक मिळविला आहे. तर पुरुषांच्या रँकिंक राउंडमध्ये तरुणदीप राय, अतनु दास आणि प्रवीण जाधव या तिघांनी काही खास प्रदर्शन करु शकले नाहीत. भारताचे खेळाडू रँकिंग राउंडमध्ये टॉप 25 मध्ये पोहचू शकला नाही. यामुळे मिक्स्ड टीम इव्हेंटमध्येही भारतीय संघाला नुकसान झाले आणि टीम नवव्या स्थानावर घसरली आहे.

 

 

 

 

                               आता टोक्यो ऑलिम्पिकचा  उद्घाटन समारंभ पार पडला आहे. कोरोनामुळे पहिल्यांदाच यावेळी प्रेक्षकांविना हा समारंभ झाला . भारताकडूनही 19 खेळाडू आणि 6 अधिकारी असे  25 सदस्यच सामील झाले आहेत. बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कॉम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग ध्वजवाहकाची भूमिका पार पाडली.