नगर अर्बन को ऑप बँक मतमोजणी
नगर अर्बन को ऑप . बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे .सकाळी मतमोजणी ला सुरुवात झाली असून सुवेंद्र गांधी यांचा नेतृत्वाखाली सहकार पॅनल ने मोठी आघाडी घेतल्याचे समोर आले आहे . १४ जागांसाठी रविवारी मतदान झाले होते . सहकार पॅनल चा १४ उमेदवारांसह एकूण २१ उमेदवार रिंगणात होते .आज दुपारी नगर शहरातील दहा जागांचा निकाल जाहीर झाला यात सहकार पॅनलचा कप बशीने मोठा विजय मिळवला आहे . सहकार पॅनल चे उमेदवार प्रत्येकी १५ हजारांपेक्षा जास्त मते घेऊन विजयी झाले आहेत . त्यामुळे शहरात विविध माध्यमांतून निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले जात आहे .