राहत्या घरात ३० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
कोपरगाव मधील सुभाषनगर भागात राहत्या घरात छतास दोरी बांधून गळफास घेऊन ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना १६ डिसेंबर रोजी घडली आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.सुनील यमाजी पगारे वय ३० असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सुनील हा सुभाषनगर भागात राहत होता. मात्र त्याने १५ डिसेंबर रोजी रात्री आपल्या राहत्या घरातील छतास दोरी बांधून गळफास घेत आपले जीवन संपविले आहे. आसपासच्या नागरिकांना ही बाब लक्षात आल्याने त्यांनी कोपरगाव शहर पोलिसांशी संपर्क केला. व पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे. दरम्यान सुनीलने आत्महत्या का केली या मागचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.