मुंबई :
नोव्हेंबर महिना सुरु झाला कि माणसे थंडीने कुडकुड करायला लागतात. महाराष्ट्र राज्यातही आता थंडीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. भर दिवसाही मुंबई ,पुण्यासह अहमदनगरमध्ये शहरात जोरदार थंडी जाणवायला सुरूवात झाली आहे.
मंगळवारी मुंबईमध्ये हंगामातील आतापर्यंतचं सर्वात कमी किमान तापमान नोंदवलं गेलं आहे. सांताक्रूझ वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि उपनगरांमध्ये 19.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर आज बुधवारी मुंबईत 19.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.