हिंमत जाधव खून प्रकरणात ७ आरोपींना जन्मठेप 

1 लाख 19 हजार रुपयांचा दंड

अहमदनगर : 
 

हिंमत जाधव खून प्रकरणी कृष्णा अशोक कोरडे (वय 26, इंद्रानगर, मालगाव, जि.बीड), सोमनाथ भानुदास मोरे ( वय 31 रा. शिंगणापुर, ता. नेवासा जि.अहमदनगर), आजिनाथ रावसाहेब ठोंबरे (वय 29,रा. जामगाव ता. गंगापूर जि.औरंगाबाद), रामचंद्र  चिमाजी शेटे (वय 44, वळणपिंप्री ता.राहुरी, जि.अहमदनगर), संदिप बहिरूनाथ थोपटे (वय 29, रा. कृषी विद्यापीठ राहुरी, ता. राहुरी जि. अहमदनगर), राहुल बाळासाहेब दारकुंडे (वय28 रा.मोरगव्हाण, ता.राहुरी.जि.अहमदनगर), जावेद करीम शेख (वय 36, रा.देवगाव, ता.नेवासा,जि.अहमदनगर) यांनी हिंमत अभिमन्यू जाधव (वय 32, रा.वळण, ता.राहुरी जि.अहमदनगर) यांना  हिम्मत जाधव यांचे वर्चस्व सहन न झाल्याने आरोपींनी सुपारी देऊन व कट रचून त्याची गोळ्या घालून हत्या केलीय. 

 
जीवे ठार मारल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश एम.व्ही.देशपांडे यांनी सर्व आरोपींना भादंवी कलम 302,120 ब अन्वये दोषी धरून प्रत्येक आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा दिलीय. 
 
एकूण 1 लाख 19 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.