समाजवादी पार्टीच्या मागणीची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

नव्याने सुरू झालेल्या धार्मिक व जयंतीच्या मिरवणुकाना शहराच्या बाहेरून काढन्याची केली होती मागणी. पारंपारिक जुन्या धार्मिक व जयंती मिरवणुका आहे त्या मिरवणूक मार्गाने कायम ठेवावा.

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहरांमध्ये धार्मिक सण उत्सव व महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यात येते. परंतु त्यांना नव्याने शहरात धार्मिक सण व महापुरुषांच्या जयंती साजरी करत त्यांची मिरवणूक देखील काढण्यात येत असून शहराचे वातावरण हे दूषित होऊन शहरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. काही समाजकंटकांच्या वतीने शहराचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न चालू असून त्यामुळे नव्याने सुरू करण्यात आलेल्या धार्मिक व महापुरुषांच्या जयंती मिरवणुकीला शहराच्या बाहेरून परवानगी देण्याची मागणी 12 मे 2023 रोजी समाजवादी पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची जिल्हाधिकारी यांनी दखल घेत संबंधित मिरवणूक मार्गाच्या संदर्भात अभिप्राय मागवला आहे.शहरात शांतता अबाधित राहील व तसेच मिरवणुकीत कर्नकर्कश आवाज काढणाऱ्या डीजेच्या प्लाजमाला बंदी घालण्यात यावी त्या व्यतिरिक्त दोन बेस दोन टॉपला मान्यता देण्यात यावी प्लाजमाच्या आवाजाने अनेक जीव गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शहरात प्लाजमा स्पीकरला बंदी घालण्यात यावी व शहरात अनेक वर्षापासून चालणाऱ्या पारंपारिक जुन्या मिरवणुका गणेश उत्सव, मोहरम, पैगंबर जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती यांना आहे तोच मिरवणूक मार्ग कायम ठेवण्याची मागणी समाजवादी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अजीम राजे यांनी केली होती या मागणीची जिल्हाधिकारी यांनी दखल घेतली आहे