ऑनलाइन वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीला 20 जूनपर्यंत मुदतवाढ – सुनील गाडगे
नगर – वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाचे आयोजन करावे अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्याकडे केली होती. सदर मागणी मंजूर झाल्याने 12 वर्षे व 24 वर्ष सेवेत पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दिनांक 29 मे 2023 ते 12 जून 2023 पर्यंत नोंदणी मुदत होती. वेळेत नोंदणी न करू शकलेल्या शिक्षकांना 20 जून 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी दिली.
31 मार्च 2024 पर्यंत सेवेची 12 वर्षे व 24 वर्षे पूर्ण झालेले शिक्षक प्रशिक्षणासाठी नोंदणी करू शकतात. शिक्षकांचे स्प्रिंगबोर्ड ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. .पात्र शिक्षकांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या लिंकवर नोंदणी करावी. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर जुलै महिन्यात प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षा सौ आशा मगर, सोमनाथ बोंतले, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, जिल्हासचिव विजय कराळे, उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे . जिल्हा सचिव महेश पाडेकर. योगेश हराळे, संभाजी पवार, कार्यवाह संजय भुसारी . हनुमंत रायकर, नवनाथ घोरपडे, सुदाम दिघे, सिकंदर शेख. संजय पवार, संतोष देशमुख, किसन सोनवणे, कैलास जाधव, संतोष शेंदुरकर, संजय भुसारी, सिकंदर शेख, संभाजी चौधरी , श्रीकांत गाडगे . रेवण घंगाळे जॉन सोनवणे .महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर, रूपाली बोरुडे. सोनाली अकोलकर विनाअनुदानितच्या अध्यक्षा रूपाली कुरूमकर आदींनी केली आहे.