साऊथ आफ्रिका मधील कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धत नगरच्या चार धावपटूंची नेत्रदिपक कामगिरी

    नगर – अहमदनगर  रनर्स क्लबचे मेंबर गौतम जायभाय, योगेश खरपुडे, जगदीप मकर, विलास भोजने या दक्षिण आफ्रिकेतील मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड झालेल्या नगरच्या चार धावपटूंनी 89 किलोमीटर धावण्याची स्पर्धा 11 जुन रोजी यशस्वीपणे पूर्ण केली व भारताचा तिरंगा ध्वजाचा सन्मान वाढविला.

     सदरील कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा मागील सहा महिन्यांपासून कसून केलेल्या सरावामुळे आम्ही  89 किलोमीटर चे अंतर 12 तासाच्या आत सर्वांनी  पुर्ण केले. साऊथ आफ्रिका येथे निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत सहजरीत्या कोणत्याही प्रकारचा ञास न होता कधी पूर्ण झाली समजले नाही. अशी माहिती या स्पर्धेत यशस्वी कामगिरी करणारे गौतम जायभाय, योगेश खरपुडे, जगदीप मकर, विलास भोजने यांनी दिली.

     साऊथ आफ्रिका येथे 1921 साली सुरू झालेली ही कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा आव्हानात्मक व सर्वात कठीण स्पर्धा आहे. पुर्णपणे डोंगर व  घाटाच्या रस्त्यावरुन होत असते. ही स्पर्धा 12 तासाच्या आत पूर्ण करावयाची असते.  प्रत्येक धावपटूचे एक स्वप्न असते, आपल्याला या मॅरेथॉनमध्ये सहभागाची संधी मिळावी. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आम्हाला जानेवारी महिन्यात झालेल्या टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे संधी मिळाली.

     धावपटूची शारीरिक व मानसिक क्षमतेची एक चाचणी  असते. त्यामध्ये आम्ही चारही जण यशस्वी झालो. या यशामध्ये अनेक व्यक्तीचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग आहे. सर्वप्रथम आमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य, अहमदनगर रनर्स क्लबचे सर्व सदस्य व शहारातील सर्व धावपटू व खेळाडू,  सर्व नातेवाईक यांचा मोलाचा वाटा आहे.

     यासर्व यशस्वी धावपटूंनी मिळविलेल्या यशाबद्दल रनर्स क्लबच्यावतीने जल्लोष करून नगरमध्ये फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.