मुंबईः
लोकलमध्ये महिला अनेकदा आपल्या लहान मुलांसोबत प्रवास करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसोबत प्रवास करणे धोक्याचे ठरत आहेत. तसंच, प्रशासनानं फक्त महिलांनाच लोकलमधून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना आता लोकल प्रवास नाकारण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयानुसार मुंबईतील रेल्वे स्टेशनच्या गेटजवळ आरसीएफ जवान तैनात करणार आहे. या आरसीएफ जवानाकडून महिलांची तपासणी करण्यात येईल जर महिलांसोबत लहान मुलं आढळलं तर त्या महिलेला लोकल प्रवासाची परवानगी मिळणार नाहीये. त्या महिलांना रेल्वे स्थानकातूनच पुन्हा घरी पाठवण्यात येईल, असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.