
अहिल्यानगर | प्रतिनिधी विशेष
पावसाळी अधिवेशनात ऐतिहासिक निर्णय:
उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित मराठी चित्रपट निर्मितीसाठी १ कोटी रुपयांची तरतूद जाहीर!
चोंडी विकास आराखड्याला मोठा चालना:
६ मे २०२५ रोजी चोंडी येथे पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत जाहीर केलेल्या ६८१ कोटींच्या चोंडी विकास आराखड्यातून
१५४ कोटींच्या कामांना स्थापत्य सल्लागार नेमणुकीद्वारे प्रत्यक्ष सुरुवात
सहकारी सूतगिरणी, चोंडीसाठी १३.२० कोटींचे भागभांडवल
दीर्घ मुदतीचे शासकीय कर्ज – १७.७० कोटी रुपये
रस्ते सुधारणा आणि अन्य कामांसाठी भरीव निधी
कर्जत–कोरेगाव–चापडगाव–चोंडी–हळगाव–फक्राबाद–कुसडगाव रस्ते रुंदीकरणासाठी २०० कोटींचा प्रकल्प
२०२५-२६ साठी ६१.३८ कोटींची तरतूद प्रस्तावित
कर्जत येथील दिवाणी न्यायाधीश निवासासाठी २५ लाख निधी मंजूर
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले:
“चोंडी विकास आराखड्याच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मारक, सूतगिरणी, रस्ते, आणि चित्रपट निर्माण हे प्रकल्प गावाला समृद्ध व ऐतिहासिक बनवतील.”