बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश करणाऱ्या तिघा बांगलादेशी नागरिकांचा पर्दाफाश!
पोलिस कोठडी संपल्यावर न्यायालयात हजर

अहिल्यानगर | वारुळे वस्ती, पोखर्डी परिसर
➤ २७ जूनच्या मध्यरात्री आर्मी इंटेलिजन्सच्या सदन कमांड व एमआयडीसी पोलिस पथकाने संयुक्त कारवाई करत तिघांना घेतले ताब्यात.
अटक करण्यात आलेले आरोपी:
जहांगीर आबू ताहेर शेख (वय ३४)
हनिफ अब्दुल खालीद शेख (वय ४०)
मुशर्रफ हबीब शेख (वय ४०)
प्राथमिक तपासात धक्कादायक बाबी उघड:
तिघेही आगरतळा (त्रिपुरा) सीमेवरून चोरट्या मार्गाने भारतात प्रवेश
सोशल मीडिया अॅप्स व मोबाईल फोनद्वारे बांगलादेशाशी थेट संपर्क
बनावट कागदपत्रांचा वापर – आधारकार्ड, पॅन, रेशन कार्ड, जन्म दाखले, बँक खाते आदी दस्तऐवज पोलिसांनी जप्त
एका नातेवाइकाचा पासपोर्टही आढळून आला
पोलिस कोठडी संपल्यावर न्यायालयात हजर
न्यायालयीन कोठडीत रवानगी
कोणत्या मार्गाने भारतात प्रवेश केला?
कोणत्या नेटवर्ककडून बनावट कागदपत्रे मिळाली?
भारतात त्यांच्या संपर्कात कोण आहेत?
या सर्व बाबींवर सखोल तपास सुरू आहे — एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रभारी स.नि. माणिक चौधरी