साहित्य, संस्कृती आणि शब्दांचा महाउत्सव!

🎤 जगद्गुरु संत तुकाराम ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात खासदार निलेश लंके यांचा गौरवपूर्ण उपस्थितीत उद्घाटन सोहळा

✍️
 साहित्य, संस्कृती आणि शब्दांचा महाउत्सव!

🎤 जगद्गुरु संत तुकाराम ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात खासदार निलेश लंके यांचा गौरवपूर्ण उपस्थितीत उद्घाटन सोहळा
📅 रविवारी निमगाव वाघा येथे साहित्यिक रंगत

अहिल्यानगर | मेट्रो न्यूज प्रतिनिधी

साहित्य, विचार आणि ग्रामीण सर्जनशीलतेचा संगम घडवणाऱ्या दुसऱ्या जगद्गुरु संत तुकाराम ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन येत्या रविवारी (आषाढी एकादशी) निमगाव वाघा (ता. नगर) येथे होणार आहे. विशेष म्हणजे या संमेलनाच्या उद्घाटक म्हणून लोकप्रिय खासदार निलेश लंके यांची निवड करण्यात आली आहे.

📍 गावातील परिवार मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता संमेलनाची भव्य सुरुवात होणार असून, याच वेळी पै. नाना डोंगरे व्यायामशाळेच्या फलकाचे अनावरण खासदार लंके यांच्या हस्ते होणार आहे.

📝 या संमेलनाचे संयोजक ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे असून, त्यांनी खासदार लंके यांना निवडीचे पत्र देत उपस्थितीची विनंती केली. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थाश्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

📚 संमेलनात राज्यभरातील प्रसिद्ध साहित्यिक, ज्येष्ठ विचारवंत आणि कवी सहभागी होणार असून, परिसंवाद, व्याख्याने, आणि मध्य सत्रात रंगणारे कवी संमेलन हे या साहित्य महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

💬 “ग्रामीण भागातील साहित्यिक चळवळीला नवी दिशा देणारे हे संमेलन, नव्या पिढीतील लेखन प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देईल,” असे मत संयोजकांनी व्यक्त केले.


 

📸 #मराठीसाहित्यसंमेलन #NileshLankeLive #SahityikMelava #NimgaonWagha #MetroMarathi #GraminKalaSanskruti