
२१ वर्ष देशाची सेवा… शेवटच्या सुट्टीसाठी निघाले… पण गावी पोहोचू शकले नाहीत…
ज्ञानदेव सुखदेव अंभोरे (वय ३७, घुटेवाडी, श्रीगोंदा)
१६ जुलै रोजी कोलकत्त्याजवळ रेल्वे रुळाशेजारी मृतावस्थेत आढळले
१५ जुलै रोजी सुट्टीसाठी गावी निघाले होते
संपर्क न झाल्याने ८ दिवसांनंतर कोलकत्ता लष्कराकडून दु:खद बातमी
पद: हवालदार – पायोनियर आर्मी युनिट, कोलकत्ता
सेवा कालावधी: २००४ ते २०२५ (२१ वर्षे)
पत्नीने वारंवार फोन केला पण प्रतिसाद नाही
युनिटला संपर्क साधल्यानंतर लष्कराने शोधमोहीम सुरू केली
अंत्यविधी: लष्करी इतमामात हावडा (पश्चिम बंगाल) येथे होणार
ज्यांना सुट्टीवर घरी यायचं होतं, त्यांना घरातलं शेवटचं दर्शनही मिळालं नाही…
श्रीगोंद्याचा एक शूर सुपुत्र वीरमरण पावला…
शतशः आदरांजली… 