२० लाखांची अफिम तस्करी करणाऱ्या एकाला जामीन मंजूर
२० लाखांची अफिम तस्करी करणाऱ्या एकाला जामीन मंजूर
२० लाखांची अफीम तस्करी करणाऱ्या एकास जामीन मंजुर
राजस्थानमधून पुण्यात अफीम विक्री करण्यासाठी आणल्याचा होता संशय
पुणे- पुणे मधील नर्हेगाव, मानाजी नगर येथील सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाने राजस्थान मधून पुण्यात अफीम विक्री करिता आणल्याचा संशयावरून आरोपी धर्माराम लादूराम चौधरी ( रा. आंबेगाव पठार , मूळ गाव जोधपुर राजस्थान ) याला पेट्रोलिंग करत असताना सुमारे २० लाख रुपये किंमतीचे अफीम हे अंमली पदार्थ मिळून आले. त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यालयासमोर हजर करण्यात आले होते. त्याची रवानगी पोलीस कोठडीत झाली होती. नंतर त्याची पोलीस कोठडी संपून त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली. तेव्हापासून आरोपी हा येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे न्यायालयीन कोठडीमध्ये होता.
त्यानंतर आरोपीने ॲड. आदेश सोमनाथ चव्हाण, ॲड.सुलेमान शेख,ॲड.उत्कर्षा पी. नलावडे यांच्यामार्फत मा.जिल्हा सत्र न्यायाधीश डोरले साहेब यांच्या कोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. सदरील जामीन अर्जात मा.न्यायालयाने सरकारी वकील,पोलीस व आरोपीचे वकील यांचा युक्तिवाद ऐकुन घेतला व आरोपीचे वकील ॲड .आदेश चव्हाण यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीस सशर्त व ५०,०००/- रुपयांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर केला.