महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषिदूत मार्फत कृषी विषयक मार्गदर्शन.

गावाचे सर्वेक्षण, माती पाणी, परीक्षण, फळे, भाजीपाला, पिके, फुल, झाडे, पिकांची लागवड, पिकव्यवस्थापन, किडरोग व्यवस्थापन, शेतीचे आर्थिक नियोजन, पाळीव जनावरांचे रोग व लसीकरण या बाबत गावकऱ्यांना दिली माहिती - कृषीदूत आकाश पाटील

प्रतिनिधी (वैष्णवी घोडके)

 

महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत श्रम शक्ती कृषी महाविद्यालय मालदाड येथील विद्यार्थी कृषीदूत  आकाश सुधीर पाटील यांनी ग्रामपंचायत मोहाडी ता.दिंडोरी येथील प्रगतशील शेतकरी प्रदीप एकनाथ जाधव पाटील यांच्या कडे ग्रामीण जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत नेमणूक करण्यात आली.

 

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राईब करा.

 

 

 

कृषीदूत आकाश सुधीर पाटील यांच्या मार्फत गावाचे सर्वेक्षण, माती पाणी, परीक्षण, फळे, भाजीपाला, पिके, फुल, झाडे इ पिकांची लागवड, पिकव्यवस्थापन , किडरोग व्यवस्थापन, शेतीचे आर्थिक नियोजन, पाळीव जनावरांचे रोग व लसीकरण या बाबत मोहाडी गावातील ग्रामस्थांशी संवाद सादण्यात येत असून गावकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले व वृक्ष लागवड योग्य पद्धतीने कशी करावी तेदेखील गावकऱ्यांना दाखवण्यात आले आहे.

 

 

 

सदर कार्यक्रमासाठी  मोहाडी येथील प्रगतशील शेतकरी प्रदीप जाधव, जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना गट नेते प्रवीण एकनाथ जाधव , किरण जाधव, भूषण जाधव यांनी सदर प्रकरणी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले .
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे संस्थापक साहेबराव नवले , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक कडलग, उपप्राचार्य डॉ. अरविंद हारदे, समनव्यक प्रा. निलेश तायडे, कार्यक्रम अधिकारी प्रा.टी.डी साबळे आदींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.