लवकरच ” AI ” धोरण होणार तयार!
शैक्षणिक: नववर्षामध्ये तंत्रस्नेही होण्याचे पहिले पाऊल माहिती व तंत्रज्ञान विभागाने टाकले असून मंत्री आशिष शेलार यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण तयार करण्याचे निर्देश आज दिले. ‘AI’ तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे यासाठी राज्याचे पहिले AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) धोरण तयार करा असे त्यांनी म्हटले आहे. ‘AI’ वापर प्रणालीत दक्षिणेतील राज्यांनी आघाडी घेतली आहे. केरळने या क्षेत्रात केलेली धोरणात्मक प्रगती कौतुकास्पद असून तमिळनाडूने सामाजिक सुरक्षा योजना ‘AI’च्या माध्यमातून राबविण्यास प्रारंभ केला आहे. महाराष्ट्रात एक वर्षापूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुगलशी कृषी क्षेत्रात एआयच्या वापराबद्दल करार केला होता. शेलार यांनी भविष्याकडे लक्ष देत मोठे पाऊल टाकले असून धोरण तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.