Ajanta-Eluru caves will be Open for Tourists from Tomorrow

आरटीपीसीआर चाचणी आवश्यक, दर दिवसा दोन टप्प्यांत १००० पर्यटकांनाच  ऑनलाईन तिकिटे 

औरंगाबाद:

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन मुळे देशभरातील सर्व पर्यटन स्थळे गेले काही महिने बंदच होती. मात्र हळूहळू अनलॉकच्या टप्प्यात ही पर्यटनस्थळे कोरोना व्हायरसची योग्य ती खबरदारी घेत सुरु होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटन स्थळं अजिंठा-वेरुळ लेणी  देखील पर्यटकांसाठी उद्यापासून सुरु होणार आहे. कोरोना व्हायरसशी संबंधित सर्व नियमांचे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन 10 डिसेंबरपासून हे पर्यटन स्थळ लोकांसाठी सुरु होतील.

तसेच मिळालेल्या  माहितीनुसार, या पर्यटनस्थळांवर लोकांसाठी गाइड म्हणू काम करणा-यांची  देखील आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. देशातील अनेक भागातील पर्यटनस्थळे याआधी सुरु झाली होती. मग महाराष्ट्रातील पर्यटनस्थळही सुरु करावी अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यामुळे येथील प्रशासनाने  राज्य सरकारसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान आज या लेणीच्या परिसराची स्वच्छता करून, उद्यापासून ही लेणी पर्यटकांसाठी खुली केली जाणार आहेत.

यासाठी केवळ ऑनलाईन तिकिट उपलब्ध होणार आहे. ज्यात दररोज  दोन सत्रात प्रत्येकी 1000 पर्यटकांना ऑनलाईन तिकिट उपलब्ध होईल. त्यामुळे तिकिट केंद्रावर तिकिटे मिळणार नाही असेही सांगण्यात येत आहे. वेरुळ, अजिंठा लेणीबरोबरच बीबी का मकबरा, पाणचक्की तसेच औरंगाबाद लेणींचाही समावेश या निर्णयामध्ये आहे.