मसालाकिंग धर्मपाल गुलाटी यांचा अखेरच्या क्षणाचा व्हिडिओ व्हायरल

 

काही लोकांच्या जगण्यातही शान असते आणि मरणही शानदारच असतं असं आपण म्हणतो, असच काहीस झालं आहे देशातील नामांकित मसाला कंपनी महाशय दी हट्टी अर्थात एमडीएचचे प्रमुख पद्मभूषण महाशय धर्मपाल गुलाटी  यांच्याबाबत …

 

नुकतेच त्यांचे निधन झालं आहे.  वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांचे त्यांची प्राणज्योत मालवली आहे.  मात्र अखेरच्या क्षणाचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्ह्ययरल झाला आहे.  यामध्ये त्यांच्या सोबत त्यांचे काही सहकारी त्यांच्याजवळ उभे राहून देशभक्तीपर गीत गात असल्याचे दिसत आहे.   ‘भारत का रहनेवाला हू’ या गाण्यावर ते देखील टाळ्या वाजवत गाणे म्हणत असल्याचे चित्र या व्हिडिओत दिसत आहे,  एरवी आपण पाहिलं तर मरणासन्न अवस्थेत असताना माणसाला कसलीच सूद बुध राहत नाही मात्र आपल्या शेवटच्या क्षणीही मसालाकिंग म्हणून ओळख असलेले धर्मपाल गुलाटी यांनी आपल्या देशाचं कौतुक करतच आपला श्वास सोडला आहे. 
 हा व्हिडिओ पाहून धर्मपाल गुलाटी यांच्या आयुष्यभराच्या योगदानाची आठवण होते.  व्हिडिओ पाहताना माणसाच्या डोळ्यात नक्की पाणी आल्याशिवाय राहत नाही…