अजित दादा VS राज ठाकरे ?

अमोल मिटकरी आणि गजानन काळे यांच्यात जुपली, अमोल मिटकरींच्या वाहनावर हल्ला

अकोला – अजित पवार पुण्यात नसताना देखील पुण्यातील धरण भरली आहेत, अशी बोचरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंचा सुपारी बहाद्दर असा उल्लेख केला होता. राज ठाकरे यांनी सोमवारी (ता.२९) पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवारांवर बोचरी टीका केली होती. पुण्यातील पावसाचा संदर्भ देत, राज ठाकरे म्हणाले की, अजित पवार पुण्यात नसताना देखील पुण्यातील धरणं भरली आहेत. यानंतर अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंचा थेट सुपारी बहाद्दर असा उल्लेख केला होता. भोंग्यांचे आंदोलन फसलेल्या सुपारी बहाददारांनी अजित पवारांवर बोलू नये हे सुपारी बहाद्दर, टोल नाका, भोंगा किंवा आणखी कुठल्याही आंदोलनाला यशस्वी झाले नाहीत. राज ठाकरेंची विश्वासार्हता संपली आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली होती. त्याटीकेनंतर मनसैनिक खूप नाराज झाले होते. यावरुन मनसैनिक आक्रमक झाले असल्याचे पाहायला मिळाले अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस च्या अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या विरोधात मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारी बाज असा करणारे अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची ही झाली. मात्र पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना वेळीच रोखल्यामुळे मोठा संघर्ष टळला. दरम्यान या घटनेनंतर आता मनसे आणि अजित पवार गटातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अकोल्यातील शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अशा हल्ल्यांना आम्ही भीक घालत नाही, ते नपुसक आहेत, असे हल्ले करून काही होणार नाही. ही गुंडगिरी महाराष्ट्रात चालणार नाही. मी या प्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे, असं करून महायुतीत सत्तेत येऊ शकतो, असं त्यांना वाटत असेल तर तसं कधीही होणार नाही, असं मिटकरी म्हणाले. तसेच अमोल मिटकरींच्या टिके नंतर मनसेनेते गजानन काळे यांनी मिटकरी आणि अजित पवारांवर पलटवार केला ७० हजार कोटींचा घोटाळा करून नुसते. पान सुपारी नाही तर महाराष्ट्राला चुना लावला अजित दादांनी, तरी घासलेट चोर वर तोंड करून आम्हाला सुपारीबाज बोलतोय, अजित दादांच्या घरातल्या सदस्यांना एकदा नवे तर दोनदा निवडणुकीत पराभूत व्हावे लागले. आणि कसल्या राज साहेब ठाकरे यांच्या यश अपयशाच्या बाथा मारतो रे…, घासलेट चोर हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष काढून दोन आमदार निवडून आणावेत तुमच्या दादांनी मग जाहीर मिशी कापून तुझ्या हातात देऊ, उगाच पवार साहेबांचा पक्ष चोरून रेगोट्या मारू नका, पक्ष चोरून पण एक खासदार निवडून आणताना दमछाक झाली तुमच्या दादांची, टी-शर्ट वर पेन लावणारा पावसाळी बेडूक मटनकरी कुठला आम्हाला शिकवायचं नाही लायकीत राहायचं लायकीत अशी घनाघाटी टीका मनसेचे गजानन काळे यांनी केली आहे.